Next
डॉ. वारीद अल्ताफ यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार
प्रेस रिलीज
Saturday, September 29, 2018 | 12:29 PM
15 0 0
Share this story

डॉ. वारीद अल्ताफपुणे : दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनतर्फे (एनबीई) नवी दिल्ली १९वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विविध विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील डॉ. वारीद अल्ताफ यांचा समावेश होता.

डॉ. अल्ताफ हे सध्या येथील प्रतिथयश संचेती रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ.वारीद यांना राष्ट्रपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. हे पदक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री अश्विनीकुमार चौभे, आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल उपस्थित होते.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अल्ताफ यांचे हात व मायक्रोव्हॅस्क्युलर रिकन्स्ट्रक्शन सर्जरीजमध्ये विशेष कौशल्य आहे. एनबीई दिल्लीच्या वतीने देशपातळीवर घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. वारीद यांनी सर्वांत जास्त गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link