Next
‘आयडीबीआय’ आणि ‘एलआयसी’चा सिनर्जी उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, May 27, 2019 | 01:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयडीबीआय बँक व एलआयसी ऑफ इंडिया यांच्यातील भागीदारीतून निर्माण होणाऱ्या बिझनेस सिनर्जीच्या माध्यमातून विविध उपक्रमावर राबविले जाते आहेत. 

‘एलआयसी’ची कॉर्पोरेट एजंट म्हणून आयडीबीआय बँक देशातील अठराशेहून अधिक शाखांतील आपल्या १.८० कोटी ग्राहकांना ‘एलआयसी’च्या सर्व विमा योजना उपलब्ध करणार आहे. त्या आधी ‘आयडीबीआय’ने एलआयसी विमा योजनांच्या मार्केटिंगसाठी एलआयसी ऑफ इंडियाशी सेवा स्तरीय करार केला आहे. 'BANCA' बिझनेसची सुरुवात २६ हजार ११६ एनओपी व १६० कोटी रुपये प्रीमिअम या विक्रमी व्यवसायाने मार्च २०१९मध्ये झाली. ‘एलआयसी’च्या वैविध्यपूर्ण उत्पादनामुळे मेट्रो व शहरी भागांतील एचएनआय ग्राहकांना आणि निम-शहरी व ग्रामीण भागांतील अन्य ग्राहकांना लक्ष्य करणे शक्य होणार आहे.

बँकेने दर्जेदार सेवा देण्यासाठी ‘एलआयसी-कनेक्ट’ हे सर्वंकष करंट अकाउंट सादर केले आहे. एलआयसी-कनेक्ट खाते एलआयसीच्या संकलन व पेमेंट यासंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध सुविधा देणार आहे. त्यामध्ये कॅश/चेक पिकअप, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर, बल्क पेमेंट, स्टॅच्युटरी पेमेंट आदींचा समावेश आहे. एलआयसी शाखांचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने, एलआयसी ऑफ इंडियाच्या कार्यात्मक गरजा पूर्ण करू शकेल, अशा प्रकारे उत्पादनाची निर्मिती केली आहे.

रिन्यूअल प्रीमिअम संकलित करण्यासाठी व योजनाधारकांच्या सोयीसाठी सक्रिय चॅनल पार्टनर बनण्याच्या उद्देशाने, बँकेने एलआयसी रिन्यूअल प्रीमिअम झटपट करण्याची सेवा देण्यासाठी आयडीबीआय बँकेच्या शाखांमध्ये नवे अप्लिकेशन दाखल केले आहे. आता, एलआयसी योजनाधारकांना रोख रकमेद्वारे व आयडीबीआय बँकेसंबंधी चेकद्वारे पॉलिसी प्रीमिअम सोयीस्करपणे भरण्यासाठी देशभरातील आयडीबीआय बँकेच्या शाखांमध्ये जाता येईल. यामुळे बँकेला क्रॉस सेल संधीही उपलब्ध होईल.

एक लाखाहून अधिक ‘एलआयसी’ कर्मचाऱ्यांशी दीर्घकालीन नाते निर्माण करण्याच्या हेतूने, ‘आयडीबीआय’ने एलआयसी ऑफ इंडियाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी खास रिटेल लोन उत्पादन तयार व सादर केले असून, ही उत्पादने गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज यांवर आकर्षक सवलत देणार आहेत.

एलआयसी ऑफ इंडियाचे ११ लाखांहून अधिक एजंटचे विस्तृत जाळे आहे. व्यवसायाच्या संभाव्य संधींचा लाभ घेण्यासाठी आणि एजंटबरोबर दीर्घकालीन, नफात्मक नाते निर्माण करण्यासाठी बँकेने गृहकर्जावरील व्याजदरामध्ये सवलत जाहीर केली आहे; तसेच, पात्र असणाऱ्या एजंटना बिझनेस करस्पाँडंट्स (बीसी) म्हणून बँकेशी सहयोग करून, अर्थार्जन करण्याची संधी दिली जाणार आहे.

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या एलआयसीच्या एसडीएम परिषदेत आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा यांनी हा उपक्रम सादर केला. यानिमित्त, एलआयसी ऑफ इंडिया व आयडीबीआय बँक यांचे अधिकारी एम. आर. कुमार यांनी चार व्यवस्थापकीय संचालकांच्या समवेत आयडीबीआय बँकेमध्ये प्लॅटिनम सॅलरी अकाउंट उघडले आहे. त्या बदल्यात, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा यांनी एलआयसी ऑफ इंडियाकडून लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. ‘आयडीबीआय’ व ‘एलआयसी’ यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे, दोन्हींमधील नाते अधिक दृढ होण्यासाठी आणि दोन्ही कंपन्यांना एकत्रित वाटचाल करण्यासाठी व एकत्रित भरभराट करण्यासाठी मदत होणार आहे.

‘या सर्व उपक्रमांमुळे आणि सिनर्जीमुळे बँकेला बॉटम-लाइनमध्ये एक हजार कोटी रुपयांचा समावेश करता येईल,’ असे आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश शर्मा यांनी सांगितले.

आयडीबीआय बँक व एलआयसी ऑफ इंडिया यांनी सिनर्जी उपक्रम पूर्ण करण्यासाठी व 'BANCA' बिझनेसचे लक्ष्य साध्य करण्यासाठी टास्क फोर्स व 'BANCA' स्टीअरिंग कमिटी यांची स्थापना केली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search