Next
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी
गांधीजयंतीला ‘एनएफएआय’तर्फे विशेष कार्यक्रम
BOI
Monday, September 30, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे. 

महात्मा गांधी यांच्या जीवनाशी संबंधित घटनांचे दुर्मीळ चित्रीकरण नुकतेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाले आहे. गांधीजींच्या अस्थी घेऊन जाणाऱ्या रेल्वेचे चित्रीकरणही त्यात आहे. या मद्रास ते रामेश्वरम रेल्वेप्रवासाचे चित्रीकरण, तसेच अमित राय यांनी निर्माण केलेला ‘रोड टू संगम’ हा चित्रपटदेखील या वेळी दाखविण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाला प्रसिद्ध छायाचित्रणकार धरम गुलाटी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात बुधवारी, दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mandar Joglekar About 15 Days ago
:)
0
0
Harshad Markad About 17 Days ago
Very nice .....
0
0

Select Language
Share Link
 
Search