Next
तांबडी जोगेश्वरी मंडळातर्फे ग्रामदेवता पुरस्कार जाहीर
डॉ. अनिल अवचट, मेधा कुलकर्णी, सूर्यकांत कुलकर्णी मानकरी
BOI
Thursday, August 08, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘ग्रामदेवता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ समाजसेवक आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल अवचट, मेक माय ड्रीम फाउंडेशनच्या संस्थापिका मेधा कुलकर्णी आणि बुलडाण्यातील केरवाडीच्या सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी यांना जाहीर  झाला आहे. 

येत्या शनिवारी, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ११ हजार १११ रुपये रोख,  मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी नगरसेवक हेमंत रासने, राजेश येनपुरे, योगेश समेळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने ‘ग्रामदेवता पुरस्कार’ देण्यास प्रारंभ झाला असून, यंदा त्याचे तिसरे वर्ष आहे. 

‘पुरस्कारार्थींच्या कार्याची माहिती समाजाला व्हावी, तसेच त्यांच्या बहुमोल विचारांतून समाजाला प्रेरणा मिळावी, यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे,’ असे तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search