चेन्नई : क्रिआ युनिव्हर्सिटीच्या अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा नव्याने अनुभव मिळण्यासाठी क्रिआ युनिव्हर्सिटी आणि दलाई लामा सेंटर फॉर एथिक्स अँड ट्रान्स्फर्मेटिव्ह व्हॅल्यूज (द सेंटर) यांनी चेन्नई येथे औपचारिक करार केला. हे सेंटर क्रिआ युनिव्हर्सिटीला अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण एथिक्स अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी मदत करणार आहे.
‘क्रिआ’ ही लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस युनिव्हर्सिटी ऑगस्ट २०१९पासून, अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बॅचच्या क्लासना सुरुवात करणार आहेत. ‘क्रिआ’ सुसूत्र शिक्षणाचा पायंडा पाडत असून, कलेची सांगड शास्त्रांशी आणि इंटलेक्च्युअल इन्क्वायरीची सांगड प्रायोगिक शिक्षणाशी घालत आहे. ‘क्रिआ’च्या शैक्षणिक समितीने तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या आठ मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नीतिमूल्ये हा एक भाग असल्याने ‘क्रिआ’च्या सुसूत्र शिक्षणाच्या दृष्टिकोनामध्ये नीतिमूल्यांचे शिक्षण अविभाज्य भाग ठरणार आहे. सर्व अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नीतिमूल्ये हे बंधनकारक स्किल कोर्स म्हणून प्रस्तावित आहे.
या वेळी ‘क्रिआ’चे कुलगुरू सुंदर रामस्वामी म्हणाले, ‘या भागीदारीमुळे ‘क्रिआ’मधील तरुणांना नैतिक प्रश्नांबद्दल विचार करता येईल, उद्देश शोधता येईल व त्यांच्या कृतीचा समाजावर होणारा परिणाम समजून घेता येईल.’

‘दलाई लामा सेंटर’चे संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी म्हणाले, ‘सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये नव्या पिढीतील तरुण नेतृत्व घडवत असताना शिक्षणाच्या केंद्रस्थानी नैतिक शिक्षण व नेतृत्व समाविष्ट करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ही दोन्ही संस्थांसाठी विशेष संधी आहे. नीतिमूल्ये ही केवळ एक विषय म्हणून शिकवली जाऊ नयेत, तर अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रमामध्ये, तसेच ‘क्रिआ’च्या मूल्यांमध्ये व संस्कृतीमध्येही ती विविध स्वरूपांमध्ये समाविष्ट करावीत.’
‘क्रिआ’मध्ये व्हेनरेबल तेनझिन प्रियदर्शी हे प्रॅक्टिस इन ह्युमॅनिटीजचे व्हिजिटिंग प्रोफेसर असणार आहेत. ‘दलाई लामा सेंटर’ पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला ‘क्रिआ’तील शिक्षकांबरोबर एथिकल लर्निंग व शिक्षणशास्त्र यावर सत्रे सुरू करणार आहे.
क्रिआ युनिव्हर्सिटीचा उद्देश उच्च क्षमता असणाऱ्या व्यक्तींना वैविधपूर्ण व परिवर्तनशील विश्वात सकारात्मक, मार्गदर्शक परिणाम नैतिक पद्धतीने निर्माण करणे हा आहे. विश्लेषणात्मक विचार, नीतिमूल्ये, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग व संवाद या बाबतीत उत्तम कौशल्यांबरोबरच सर्व शाखांमध्ये तीन वर्षांच्या निवासी बीए (ऑनर्स) व बीएससी (ऑनर्स) पदवी उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसाठी प्रवेशप्रक्रिया एक नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू झाली आहे.
क्रिआ युनिव्हर्सिटीची वेबसाइट : www.krea.edu.in