Next
अॅक्झोनोबेलचे वॉटरप्रूफिंग क्षेत्रात पदार्पण
प्रेस रिलीज
Friday, April 27 | 01:57 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘अॅक्झोनोबेल’ या जागतिक पातळीवरील कंपनीने ‘ड्यूलक्स अॅक्वाटेक’ या नव्या ब्रँडच्या माध्यमातून वॉटरप्रूफिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. ओल आणि गळतीसंदर्भातील सर्व समस्यांचे समाधान करतील अशी अद्ययावत वॉटरप्रूफिंग उत्पादने कंपनीने आणली आहेत. एक्स्टेरियर बेसकोट्स, इंटेरियर बेसकोट्स आणि प्री-ट्रीटमेंट कोट्स आणि क्रॅकफिलर्स अशा अनेक  उत्पादनांचा त्यात समावेश आहे.  

याबाबत कंपनीच्या दक्षिण आशिया  डेकोरेटीव्ह पेंट्स विभागाचे क्लस्टर जनरल मॅनेजर डेव्हिड तेंग म्हणाले, ‘ड्यूलक्स अॅक्वाटेक’ हे वॉटरप्रूफिंग क्षेत्रातील एक नव्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. युरोपच्या वॉटरप्रूफिंग बाजारपेठेत आम्ही अग्रस्थानी आहोत आणि बऱ्याच संशोधनानंतर आम्हाला खात्री पटली की, या उत्पादनांचे भारतात पदार्पण होण्याची हीच योग्य वेळ आहे. या उत्पादनांचे भारतात जोरदार स्वागत होईल याची आम्हाला खात्री आहे. या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये प्रथमच २०मिमी,१०मिमी तसेच पाच मिमी क्रॅकफिलर्सचाही समावेश आहे. ही सर्व उत्पादने सुरकुत्या-विरहित आहेत. त्यामुळे एकाच वापरात अत्यंत सफाईदार सेवा मिळते. अॅक्वाटेक इंटेरियर बेसकोट्स इमारतीचे सर्व अंतर्गत वॉटरप्रूफिंग करतात. स्विमिंग पुल, वॉटर टँक्स इत्यादी विविध ठिकाणीही यांचा वापर करता येतो. ही उत्पादने सहज हाताळता येणाऱ्या आकारांमध्ये आणि वजनांमध्ये भारतभर उपलब्ध आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link