Next
पंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा
BOI
Tuesday, July 17, 2018 | 10:55 AM
15 0 0
Share this storyसोलापूर : ‘झाडू संताचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग’ या संत वचनाप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर १६ जुलै रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात राबविलेल्या महास्वच्छता अभियानात एकाच दिवसात सुमारे १४ टन कचरा गोळा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या अभियानात सुमारे चार हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पंढरपुरातील ६५ एकर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, पत्राशेड दर्शन बारी, भक्ती मार्ग, वाखरी आणि नदीपात्रातील वाळवंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली होती. तीन ट्रक, दोन ट्रॅक्टर व सुमारे २९ घंटा गाड्यांच्या साहाय्याने हा कचरा शहराबाहेर हलविण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप विभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘आषाढी वारीपूर्वी आणि वारीनंतरही पंढरपुरात स्वच्छता राहावी यासाठी प्रशासन अग्रही आहे. येथे येणाऱ्या वारकऱ्याला पंढरपुरातील स्वच्छता पाहून समाधान वाटावे हाच मुख्य हेतू आहे. वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्येस सामोरे जावे  लागू नये यासाठी महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.’

सोमवारी सकाळपासून वरुण राजाने पंढरपुरात हजेरी लावली. पाऊस सुरू असतानाही पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपुरात आलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम केले. हातात झाडू घेऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर स्वच्छता केली; तसेच मार्गावर कोठेही कचखडी राहणार नाही याची पाहणी केली. जिल्हातील सर्व विभागांचे प्रमुख व संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
एस. एम . पाढरे About 221 Days ago
अशा लोकांना अशा कामांसाठी वेळ नसतो . त्यामुळे त्यांनी लोकांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे .
0
0

Select Language
Share Link