Next
तांडा वस्त्यांवर जाणारा रस्ता पक्का करण्याची मागणी
BOI
Monday, December 17, 2018 | 12:18 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली बुद्रुक परिसरातील फुलसिंग नाईक तांडा, बळीराम नाईक तांडा येथून शहरात जाण्या-येण्यासाठी पक्का रस्ता नाही. परिणामी या गावातील रुग्ण, तसेच गरोदर मातांना उपचारासाठी नेताना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा मागण्या करूनही पक्का रस्ता झालेला नाही. त्यामुळे गोरसेना या सामाजिक संघटनेने नुकतेच तहसीलदार, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच उपविभागीय अभियंता (बांधकाम) आणि हदगावच्या आमदारांना निवेदन दिले आहे. निवेदनाचा तात़डीने विचार न केल्यास नाईलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.

‘या भागात पक्का रस्ता नसल्याने काही गरोदर मातांचे बाळंतपण रस्त्यामध्ये झाल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक गरोदर मातांना जीव गमवावा लागला आहे. शाळकरी मुलांना शाळेसाठी आणि वृद्ध व्यक्तींना सरकारी कामांसाठी अत्यंत जिकिरीने रस्ता पार करावा लागत आहे. अनेक अपघातही यामुळे झाले आहेत. १८ जुलैलाही या संदर्भात निवेदन देण्यात आले होते; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आताच्या निवेदनाची दखल न घेतल्यास गोरसेना संघटना लोकशाही मार्गाने आंदोलन करील,’ असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर गोरसेनेचे अध्यक्ष लेखन जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व फुलसिंग नाईक तांडा, बळीराम नाईक तांडा येथील गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search