Next
प्रभाकर आणि प्रतिभा जोशींचा अन्नपूर्णा पुरस्काराने गौरव
BOI
Friday, October 05, 2018 | 02:29 PM
15 0 0
Share this story

प्रभाकर जोशी पुरस्कार प्रदान करताना जयंत सावरकर.

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या समारंभांमध्ये हजारो जणांसाठी रुचकर स्वयंपाक करण्याचे काम गेली अनेक वर्षे लीलया करणाऱ्या प्रभाकर आणि प्रतिभा जोशी या दाम्पत्याचा नुकताच अन्नपूर्णा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सांगलीतील श्रीमती इंदिराबाई सदाशिव महाबळ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. सांगलीतील महाबळ भुवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

प्रतिभा जोशी यांचाही गौरव

मानचिन्ह आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंदिराबाईंचे नातू गेल्या आठ वर्षांपासून हा पुरस्कार पाककलेतील विशेष कामाबद्दल देत आहेत. प्रभाकर जोशी यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप. त्यांनी १९६०मध्ये रत्नागिरीत व्यवसाय सुरू केला. मामा महेश्वषर बापट आणि वडील विष्णू जोशी हे त्यांचे गुरू. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील दत्तमंगल कार्यालयात कामाला सुरुवात केली. उत्तमतात्या जोशी व कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे जोशी यांनी सांगितले. तसेच पत्नीचाही या कामामध्ये मोठा सहभाग असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वयंपाकापासून विविध प्रकारचे रुचकर व चविष्ट खाद्यपदार्थ बनवण्यात प्रभाकर जोशी पारंगत आहेत.

डिसेंबर १९९५मध्ये चिपळूण येथे झालेल्या नाट्यसंमेलनात सुमारे चार हजार जणांचा, तसेच जयगड येथे जयविनायक मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याप्रसंगी तीन हजार भाविकांचा स्वयंपाक जोशी दाम्पत्याने केला होता. आज जोशी दाम्पत्याचे दोन मुलगे, सुना, कुटुंबीय असे सगळे टिळक आळी येथे या व्यवसायात कार्यरत आहेत.

जयंत सावरकर व महाबळ कुटुंबीयांसमवेत जोशी दाम्पत्य आणि कुटुंबीय.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link