Next
पाणी वाहून आणणाऱ्या ‘नीरचक्र’चे वितरण
‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन’चा २५ कुटुंबांना मदतीचा हात
BOI
Wednesday, September 04, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

ट्री इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘नीरचक्र’चे पुरंदर तालुक्यातील २५ कुटुंबांना वितरण करण्यात आले.

पुणे : ग्रामीण भागात अनेकदा दूरवरून पाणी आणावे लागते. विशेषतः महिलांना खडबडीत रस्त्यांवरून डोक्यावर, कंबरेवर हंडे, कळश्या घेऊन पाणी आणण्याचे अत्यंत कष्टप्रद काम करावे लागते. एकावेळी जास्त प्रमाणात पाणी आणणेही शक्य होत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी ‘नीरचक्र’ हा एक अभिनव उपाय विकसित करण्यात आला आहे. ही पाणी वाहून आणणारी ढकलगाडी आहे. याद्वारे एकावेळी ८० लिटर पाणी वाहून आणता येते. नुकतेच ट्री इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ‘नीरचक्र’चे पुरंदर तालुक्यातील २५ गरीब कुटुंबांना वितरण करण्यात आले. 


‘‘नीरचक्र’ ही पाणी वाहून नेणारी आधुनिक ढकलगाडी असून, त्यामध्ये वॉटर फिल्टर, गायरोस्कोपिक स्टॅबिलायझर, ब्रेक आणि नळाची तोटीही आहे.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी या प्रकल्पासाठी एक लाख रुपयांची मदत केली आहे. तन्वीर इनामदार यांच्या उपस्थितीत ‘नीरचक्र’चे वितरण करण्यात आले,’ अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख तन्वीर अस्लम इनामदार यांनी दिली 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search