Next
‘बिग बाजार’चा ‘पब्लिक हॉलिडे सेल’
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 04:50 PM
15 0 0
Share this story

पुणे : फ्युचर ग्रुपच्या प्रमुख हायपरमार्केट शृखंलांपैकी एक बिग बाजार पुन्हा एकदा २८ एप्रिल ते दोन मे २०१८ दरम्यान भव्य शॉपिंग फेस्टिवल ‘बिग बाजार पब्लिक हॉलिडे सेल’ घेऊन आला आहे. ‘हर दिन लोएस्ट प्राइस’ या आपल्या वचनाशी बांधील राहत बिग बाजारने एक हजार ५००हून अधिक रोजच्या आवश्यक उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. आपल्या ऑफरिंग्जमध्ये अधिक भर करत बिग बाजार ‘पब्लिक हॉलिडे सेल’दरम्यान सर्व ग्राहकांना होम डिलिव्हरी व फास्ट बिलिंगची सुविधा देईल.

पाच दिवस चालणारा बिग बाजारचा ‘पब्लिक हॉलिडे सेल’ शॉपिंग फेस्टिवल देशातील १३२ शहरांमधील ३४०हून अधिक बिग बाजार, फूड बाजार, एफबीबी व हायपरसिटी स्टोअर्समध्ये आयोजित करण्यात येईल. बिग बाजारतर्फे किराणा माल, घरगुती सजावटीच्या वस्तू, पोशाख, इलेक्ट्रॉनिक उत्पादने यांसारख्या विविध प्रकाराच्या उत्पादनांवर कमी किंमत, आकर्षक सूट व अद्वितीय डिल्स दिल्या जाणार आहेत.

मसाले, स्टेपल्स, पेये, वैयक्तिक केअर उत्पादने यांसारख्या रोजच्या आवश्यक वस्तूंवरील ‘बाय वन गेट वन फ्री’ ऑफरमुळे ग्राहकांना महिनाभराचे रेशन भरता येईल; तसेच दोन हजार रुपयांची खरेदी करणार्‍या ग्राहकांना त्यांच्या फ्यूचर पे वॉलेटमध्ये २०० रुपयांची कॅशबॅक मिळेल. या फेस्टिवलला अधिक उत्साहवर्धक करत सर्व रुपे डेबिट व क्रेडिट कार्ड्स युजर्सना किमान एक हजार ५०० रुपयांच्या खरेदीवर १० टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

‘पब्लिक हॉलिडे सेल’बाबत बोलताना बिग बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक म्हणले, ‘बिग बाजारमध्ये आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ‘पब्लिक हॉलिडे सेल’सह आम्ही शॉपिंग अनुभवापासून कॅशबॅक ऑफर्स असलेली उत्पादने, बचत करणारी सूट व आकर्षक डिल्ससह सर्वोत्तम ऑफर्स देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आनंददायी व त्रासमुक्त शॉपिंग अनुभव घेण्यासाठी आमच्या ग्राहकांना आमंत्रित करतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link