Next
मोटोरोलाचे पुण्यात ५० मोटो हब सुरू
प्रेस रिलीज
Monday, April 30 | 05:32 PM
15 0 0
Share this story


पुणे : महाराष्ट्रातील आपली रिटेल उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने मोटोरोला मोबिलिटीने पुणे शहरातील ५० नवीन मोटो हब सुरू केले आहेत. येथे ग्राहकांना मोटोरोलाची सर्व उत्पादने सहजपणे उपलब्ध होतात. मोटो इ फोर प्लस व मोटो जी फ़ाईव्ह एस प्लस यासारख्या फक्त ऑनलाइन उपलब्ध असलेल्या हँडसेटससह मोटो एक्सफोर व मोटो झेड टू यांचाही  समावेश आहे.
 
जीएफकेच्या मते, महाराष्ट्र ही देशातील स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होणारी बाजारपेठ आहे. येथे दर महिन्याला दहालाख स्मार्टफोन्सची विक्री होते. म्हणूनच, भारतातील एकूण स्मार्टफोनची विक्री होणाऱ्या बाजारपेठांमध्ये या बाजारपेठेचे १५ टक्के योगदान आहे. पुणे शहराचे एकूण स्मार्टफोनची विक्री होणाऱ्या बाजारपेठांमध्ये दहा  टक्के योगदान आहे. त्यामुळे  महाराष्ट्र ही मोटोरोलासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.
 
मोटोरोला मोबिलिटी इंडियाच्या प्रादेशिक विक्री विभागाचे प्रमुख बी. व्ही. मलिकार्जुन राव म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना रिटेलचा संस्मरणीय अनुभव देणाऱ्या या  उपक्रमाबाबत आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रातील लोकांकडून मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही आमची रिटेल उपस्थिती वाढवण्याचे कार्य सुरूच ठेवू आणि आमच्या ग्राहकांना सोईस्कर होईल अशा ठिकाणी आम्ही उपस्थित असण्याची खात्री घेऊ.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link