Next
अरुण शेवते, रामचंद्र गुंजीकर, श्रीराम गीत
BOI
Monday, April 30 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘दररोज तुला पाऊस म्हणायचे म्हणजे पाऊस अंगातच भिनायला हवा; एक मात्र झाले त्या दिवसापासून, मृग नक्षत्राची वाट पाहण्याचे दिवस संपून गेले’ असं लिहिणारे कवी अरुण शेवते, भाषिक संशोधन, व्याकरण, ललित वाङ्‌मय अशा विषयांवरचे उत्तमोत्तम लेख देणाऱ्या ‘विविधज्ञानविस्तार’ मासिकाचे आद्य संपादक रामचंद्र गुंजीकर आणि संशोधक, लेखक श्रीराम गीत यांचा ३० एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
........
अरुण शेवते

३० एप्रिल १९५८ रोजी जन्मलेले अरुण शेवते हे कवी, प्रकाशक आणि ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक वेळच्या दिवाळी अंकासाठी एक संपूर्ण नवीन विषय देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांकडून त्यावर लेख लिहून घेऊन नावीन्यपूर्ण पद्धतीने दिवाळी अंक सजवण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय झाली. 

कवी, लेखक, पत्रकार, राजकारणी, समाजकारणी, अभिनेते, गायक, विचारवंत अशा विविध क्षेत्रांतल्या मंडळींनी ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकासाठी लेखन केलं आहे. वाचकांना त्यामुळे अनेक नवीन विषयांचं ज्ञान मिळत गेलं आहे. 

आभाळ झेलण्याचे दिवस, दोस्ताना, एकच मुलगी, मला उमगलेली स्त्री, माझे गाव माझे जगणे, मन पाहि मागे मागे..., माझं जन्मघर, पाऊस ज्यांच्या हाती शून्य होते, नापास मुलांची गोष्ट, नापास मुलांचे प्रगतिपुस्तक, रात्ररंग, निळ्या आभाळाचे गाणे, पंतप्रधानांना पत्र – यांसारखी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना दया पवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

(अरुण शेवते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

रामचंद्र भिकाजी गुंजीकर 

३० एप्रिल १८४३ रोजी जांबोटीमध्ये (बेळगाव) जन्मलेले रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे लेखक आणि ‘विविधविज्ञानविस्तार’ या प्रख्यात मासिकाचे आद्य संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. भाषिक संशोधन, व्याकरण, ललित वाङ्‌मय अशा विषयांवरचे उत्तमोत्तम लेख त्यांनी त्यातून प्रसिद्ध केले. मराठीबरोबरच त्यांना संस्कृत, उर्दू, इंग्लिश, गुजराती, कानडी आणि बंगाली अशा अनेक भाषा येत असल्याने त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण आणि सामान्य ज्ञान देणारी सदरं सुरू करून अंक माहितीपूर्ण केला होता. भाषा, व्याकरण आणि लेखनशुद्धीसंदर्भात त्यांचा विशेष अभ्यास होता. 

त्यांनी ‘दंभहारक’ नावाच्या मासिकाचंही संपादन केलं होतं.
 
मोचनगड, गोदावरी, अभिज्ञान शाकुंतल, रोमकेतुविजया, विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था, सरस्वती मंडळ, भ्रमनिरास, सौभाग्यरत्नमाला, कौमुदीमहोत्साह खंड १, २ ,३, सुबोधचंद्रिका, रामचंद्रिका, कन्नडपरिज्ञान, लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१८ जून १९०१ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं.
.......

श्रीराम वसंत गीत

३० एप्रिल १९४८ रोजी जन्मलेले श्रीराम वसंत गीत हे संशोधक, लेखक म्हणून ओळखले जातात. 

सृष्टीविज्ञानगाथा, वैद्यकाचा बाजार, करिअर कसं निवडावं, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना महाराष्ट्र राज्य विज्ञान ग्रंथ पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय वैज्ञानिक ललित पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link