Next
आनंदीबाई शिर्के, लॅरी मॅकमर्ट्री
BOI
Sunday, June 03, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

प्रसिद्ध बालसाहित्यकार आनंदीबाई शिर्के आणि ‘ब्रोकबॅक माउंटन’मुळे गाजलेला लेखक लॅरी मॅकमर्ट्री यांचा तीन जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......

आनंदीबाई शिवराम शिर्के 

तीन जून १८९२ रोजी बडोद्यामध्ये जन्मलेल्या आनंदीबाई शिवराम शिर्के या कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचं ‘सांजवात’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. १९३८ सालच्या अखिल भारतीय मराठी महिला परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. 

कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या कळ्या, भावनांचे खेळ व इतर गोष्टी, तृणपुष्पे, गुलाब जांब, माझ्या आवडत्या गोष्टी, वाघाची मावशी व इतर गोष्टी, कुरूप राजकन्या व तेरावी कळ आणि इतर गोष्टी, आपली थोर माणसे, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

३१ ऑक्टोबर १९८६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(आनंदीबाई शिर्के यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

लॅरी मॅकमर्ट्री
तीन जून १९३६ रोजी टेक्सासमध्ये जन्मलेला लॅरी मॅकमर्ट्री हा अमेरिकेचा प्रसिद्ध कादंबरीकार आणि पटकथाकार म्हणून ओळखला जातो. ‘ओल्ड वेस्ट’ किंवा ‘टेक्सास’मध्ये घडणाऱ्या त्याच्या कादंबऱ्यांबद्दल तो विशेष प्रसिद्ध आहे. ‘लोनसम डव्ह’ या त्याच्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. 

‘ब्रोकबॅक माउंटन’ या आपल्याच कादंबरीवर त्याने त्याच नावाच्या सिनेमाची पटकथा लिहिली आणि त्याला मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हॉर्समन, पास बाय ही त्याची टेक्सासच्या रँचमध्ये घडणारी पहिली कादंबरी होती. पुढे त्याने दी लास्ट पिक्चर शो, टेक्सासव्हिले, व्हेन दी लाईट गोज, ऱ्हाइनो रँच, स्ट्रीट्स ऑफ लॅरीडो, डेड मॅन्स वॉक, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग टू बी स्ट्रेंजर्स, टर्म्स ऑफ एनडिअरमेंट यांसारख्या त्याच्या सर्वच कादंबऱ्या गाजल्या आणि बहुतेकांवर सिनेमे बनले.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search