Next
साहित्यिक कट्ट्यावर मुलांची किलबिल
प्रेस रिलीज
Saturday, November 18, 2017 | 04:57 PM
15 0 0
Share this article:

पुणे : मुलांशी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दृढ नाते जोडलेल्या शोभा भागवत यांनी बालदिनानिमित्त मुलांसाठी कमला नेहरू उद्यानातील साहित्यिक कट्ट्यावर कार्यक्रम सादर केला. त्यांना गरवारे बालभवनच्या संचालिका डॉ. विदुला म्हैसकर यांनी साथ दिली.

नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्यातर्फे साहित्यिक कट्ट्यावर बालदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वराज या छोट्या मुलाची गोष्ट डॉ. विदुला यांनी सांगितली. या दरम्यान त्यांनी मुलांना कागदाच्या टोप्या शिकविल्या. इरलं, बावर्ची, वाणी, सावकार, फायर ब्रिगेड, हवालदार यांच्या टोप्यांसह कागदाची बोट आणि शेवटी लाईफ जाकेट ही त्यांनी करून दाखवले.  

भागवत यांनी मुलांना कविता व गोष्टी सांगितल्या. त्यांची ‘माझ्या बोटात जादू आहे’ ही कविता मुलांना आवडली. दलाई लामांच्या कवितेने मोठ्यांना अंतर्मुख केले. नगरसेविका सहस्रबुद्धे यांनी तीन गाणी मुलांबरोबरच पालकांकडूनही म्हणून घेतली.

या वेळी नगरसेविका स्मिता वस्ते, श्री. बापट, श्री. शाळीग्राम व वासंती काळे उपस्थित होत्या. पुणे मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य शाम भुर्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. साहित्यिक कट्ट्यावरचा हा १७वा कार्यक्रम होता.

‘पुढील महिन्यात शब्दप्रभू मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यावरील कार्यक्रम सादर केला जाईल,’ असे माधुरी सहस्रबुद्धे यांनी या वेळी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search