Next
‘विकासाच्या मॉडेलमध्ये भारत चीनच्या पुढे’
प्रेस रिलीज
Wednesday, June 13, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

क्युबेक (कॅनडा) : क्युबेकच्या उप मुख्यमंत्री डॉमिनिक अंगाल्डे यांच्याशी झालेल्या यशस्वी बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कॅनडा दौऱ्यात आज (ता. १३) क्युबेकचे मुख्यमंत्री फिलीप क्विलार्ड तसेच अंतर्गत व्यवहार मंत्री आणि ला फ्रँकोफिन क्रिस्टीन स्टे-पियर यांची भेट घेतली. क्युबेकने भारतात व्यापार सुरू करण्याला दहा वर्षे पूर्ण झाली. या महत्त्वाच्या टप्प्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि क्युबेकच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.

‘दोन्ही सरकारे एक संयुक्त समिती स्थापन करतील, ज्याची वर्षातून किमान एकदा बैठक होईल. ही माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, वैमानिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विद्युत, कृषी आणि संलग्न क्षेत्रांसह इतरही क्षेत्रांत गुंतवणूक आणि सहकाऱ्याच्या संधी शोधण्यासाठी प्रयत्न करेल,’ असे या घोषणापत्रात नमूद केले आहे.

क्युबेकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रास्ताविकात भारताचा उल्लेख ‘विकासाच्या मॉडेलमध्ये अग्रेसर आणि क्युबेकसाठी उच्च प्राधान्य असलेला देश’ असा केला. ते म्हणाले, ‘क्युबेक स्थित बाँबारडीयरने महाराष्ट्रातील मेट्रो रेल्वे प्रकल्पात उल्लेखनीय योगदान द्यावे, विद्यार्थी आदानप्रदाणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता हब विकसित करावे, तसेच माँट्रियल बंदर आणि महाराष्ट्रातील बंदरांदरम्यान सहकार्य वाढावे, अशी आपली इच्छा आहे.’ भारतातील योग्य व्यवसाय सहकाऱ्यांबद्दल बोलताना क्युबेकच्या मुख्यमंत्र्यांनी उदय कोटक, अजय पिरामल, राजेश शह, नंदन निलेकणी आणि एन. चंद्रशेखर यांचा आत्मियतेने उल्लेख केला आणि त्यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या अनेक जमेच्या बाजूंची माहिती दिली आणि येथील २५ वर्षांखालील १३० दशलक्ष युवकांच्या, जे राज्याच्या लोकसंख्येच्या ५० टक्के आहेत, कौशल्याचा फायदा घेण्यासाठी येथे गुंतवणूक वाढविण्याची क्युबेक सरकारला विनंती केली. फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील आर्थिक सेवा क्षेत्र, नवे पुरोगामी फिनटेक हब तसेच लॉजीस्टीक धोरण या सारख्या क्षेत्रात क्युबेक आपला सहभाग वाढवू शकते.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link