Next
मुलांनी बनवलेल्या ‘बायसिकल’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड
BOI
Friday, October 05, 2018 | 03:40 PM
15 0 0
Share this article:


पुणे :  शालेय विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार सायन्स क्लब’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सायन्स पार्क’च्या सहकार्याने निर्माण केलेल्या ‘बायसिकल’ या विज्ञान लघुपटाची भारत सरकारच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. हा महोत्सव  लखनऊ येथे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

सिद्धार्थ दामले
हा लघुपट रामचंद्र राठी विद्यालयात नववीत शिकणाऱ्या सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याने दिग्दर्शित केला असून, अहिल्यादेवी प्रशालेत दहावीत शिकणाऱ्या सुखदा दामले या विद्यार्थिनीने चित्रीकरण केले आहे, तर स.प. महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या यश भालेराव याने संकलन केले आहे. लेखन डॉ. हर्षदा बार्बेकर यांचे असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’चे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण दामले आणि  ‘मीडिया मॅजिक इन्स्टिट्यूट’चे राजू भोसले यांनी मार्गदर्शन केले आहे. 

‘शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या लघुपटाद्वारे सायकलमधील भौतिकशास्त्रीय संकल्पनांची माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने मिळते. गुरुत्वाकर्षण, हवेचा दाब असे विविध भौतिकशास्त्रीय नियम अतिशय सोप्या पद्धतीने यात स्पष्ट करण्यात आले आहेत,’ अशी माहिती डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिली. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search