Next
नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा
प्रेस रिलीज
Tuesday, September 18, 2018 | 11:48 AM
15 0 0
Share this storyपुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा २५०० फूट जागेत साकारण्यात आला होता. दिव्य स्वरूपात उभारलेल्या या देखाव्यातून भाविकांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाते आणि त्यांच्या १६० कलाकार कामगारांनी अवघ्या १८ दिवसांत दिवसरात्र मेहनत करून तयार केला. या देखाव्याचे उद्घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते झाले.

शिर्डी येथील साईबाबा यांचे समाधी मंदिराची प्रतिकृती ७३ फूट उंच, ७२ फूट लांब व २६ फूट रुंद आकारात इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सात फूट उंचीची श्री साईबाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीप्रमाणेच घडविण्यात आली आहे. मूळ मंदिराशेजारीच महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई देवीच्या मंदिराची २२ फूट लांब, १० फूट रुंद व १८ फूट उंच प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

समाधी मंदिराच्या डाव्या हातास द्वारकामाईंच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या मंदिरातच खास शिर्डीहून आणलेल्या धुनीचा वापर केला जात आहे; तसेच साईबाबांचे दर्शन ज्या कमानीतून होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे, तशीच कमान येथे तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिरातील वातावरण प्रसन्न वाटावे म्हणून सतत प्रार्थनेचा जयघोष केला जात आहे.

या देखाव्याबाबत बोलताना आमदार भोसले म्हणाले, ‘नरवीर तानाजी तरुण मंडळ यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे; तसेच साईबाबा यांच्या समाधी दिनाचे हे शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून आम्ही मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साईबाबा यांच्या शिर्डी येथील मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा सादर करण्याचा निर्णय घेतला. अनेक भाविकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना शिर्डी येथे दर्शनास जाणे अशक्य असते, या सर्वांची इच्छा लक्षत घेऊनच आम्ही हा देखावा सादर केला आहे.’  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Avinash R Kanhaiya About 155 Days ago
Decoration is dicto of Holy Shirdi .
0
0

Select Language
Share Link