Next
‘लष्करी सेवा परीक्षा’ मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
६०हून अधिक विद्यार्थी घेणार लष्करी सेवा शिक्षण
BOI
Tuesday, May 14, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : येथील ‘सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ’ आणि ‘टाटा कॅपिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच सुधागड तालुका मराठा समाज, पाली यांच्या सहकार्याने लष्करी सेवा व पॅरामिलेटरी भरतीपूर्व परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साताऱ्यातील ‘मेस्को मिलिटरी ट्रेनिंग स्कूल’चे कर्नल प्रकाश नरहरी व ‘टाटा कॅपिटल’चे प्रकाश महाडिक यांनी विद्यार्थ्यांना भरतीपूर्व लष्करी सेवा प्रशिक्षणाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. 

पाली येथील ‘मराठा समाज सभागृह’ याठिकाणी, सुधागड तालुक्यातील १०वी, १२वी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर घेण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांपैकी ६०हून अधिक विद्यार्थ्यांनी लष्करी सेवेचे शिक्षण घेण्याची तयारी दर्शवली. हे विद्यार्थी अंतिम निवडीसाठी २३ मे रोजी ‘सातारा मिलिटरी स्कूल’ येथे जाणार असल्याची माहिती ‘सुधागड तालुका रहिवासी सेवा संघा’चे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी दिली.

कॅप्टन प्रकाश नरहरी यांनी सैनिकी क्षेत्रामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या संधी व त्यासाठी लागणाऱ्या शारीरिक व शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली. तसेच मुलींना मिळणाऱ्या संधींचीही माहिती दिली. ‘टाटा कॅपिटल’चे प्रकाश महाडिक यांनी युवकांना सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या वेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी, सुधागड तालुका राहिवासी सेवा संघाच्या वतीने सुधागड तालुक्यातील माध्यमिक शाळेला करत असलेल्या मदतीची माहिती दिली. ‘असा कार्यक्रम तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आला असून, तालुक्यातील युवकांनी याचा फायदा घ्यावा’, असे आवाहनही त्यांनी केले. युवकांनी कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल नरहरी यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाला सरचिटणीस राजू पातेरे, अविकांत साळुंके, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, शिक्षण समितीप्रमुख वसंत लहाने, माजी अध्यक्ष विठ्ठल खेरटकर, शिवाजी दळवी, सांस्कृतिक प्रमुख जनार्दन घोंगे, उपखजिनदार विजय जाधव, अंकुश कोकाटे, तुकाराम डिगे, गजानन जंगम, भगवान तेलंगे, दत्तात्रय दळवी, अनिल चव्हाण उपस्थित होते. तसेच सुधागड मराठा समाजाचे अध्यक्ष गणपत सितापराव, उपाध्यक्ष गंगाधर जगताप, जीवन साजेकर, लहाने, नीलेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. 

सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पालकांसह या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सातारा येथे होणाऱ्या लष्करी सेवा भरतीपूर्व प्रशिक्षणाकरीता जाण्यासाठी ६०हून अधिक विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली आहे. अंतिम निवडीसाठी ते २३ मे रोजी सातारा येथे जाणार आहेत. शिबिरासाठी होणाऱ्या खर्चापैकी ९०टक्के खर्च सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ व टाटा कॅपिटलतर्फे करण्यात येणार आहे. उर्वरित १० टक्के खर्च पालकांनी करायचा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 131 Days ago
Admirable enterprise . More in different locations , please.
0
0

Select Language
Share Link
 
Search