Next
‘ब्रेन ओ ब्रेन’ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान
BOI
Monday, January 14 | 05:46 PM
15 0 0
Share this story

‘ब्रेन ओ ब्रेन’ स्पर्धेतील विजेत्यांसह अरुण सुब्रमण्यम व भरत अग्रवाल

चिंचवड : ‘ब्रेन ओ ब्रेन’ संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या ‘१०१ व्या राज्यस्तरीय ब्रेन ओ ब्रेन फेस्ट’चे विजेतेपद मोशी केंद्राच्या स्पर्शीका माणगावकर, रिया महाजन, रिया सुब्रे, देव वाधवा, पी. साहिल, सरिता जोशी, अनुराग लालवाणी यांनी पटकावले. 

या स्पर्धेत मोशी केंद्राच्या आयुष चौधरी, ऋत्वा देल्वाडीया, माही कळंबे, श्रावणी घुले, श्रीराज चोपडेकर यांनी सुवर्ण तर, हर्षिदा पाटील, श्रावणी पाटील, दैविक देसाई, निहारिका डावरी, राजवीर लोंढे यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सांघिक गटात इचलकरंजी केंद्राने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. खारघर केंद्राने द्वितीय, तर गांधीनगर केंद्राने तृतीय स्थान पटकावले.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृह येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. विश्वकर्मा विद्यापीठाचे संचालक भरत अग्रवाल व चेन्नई येथील ‘ब्रेन ओ ब्रेन किड्स’ अकादमीचे संचालक अरुण सुब्रमण्यम यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी ‘ब्रेन ओ ब्रेन महाराष्ट्र’च्या रचना बागडीया, स्मिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.  

‘ब्रेन ओ ब्रेन’ ही चार ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांचा अबॅकसच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करणारी संस्था असून, पुणे व पिंपरी-चिंचवड भागात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. गेल्या १५ वर्षांपासून जागतिक व राष्ट्रीय स्तरावर लहान मुलांच्या शिक्षणासाठी व प्रशिक्षणासाठी ही संस्था कार्यरत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link