Next
शिवांजली डान्स अॅकॅडमीच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद
BOI
Tuesday, March 12, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this story



पुणे : शिवांजली डान्स अॅकॅडमीचा दहावा वर्धापनदिन जेष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका भारती बर्‍हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे १० मार्च २०१९ रोजी साजरा करण्यात आला.

अनुजा बाठे नृत्य दिग्दर्शित ‘हरी-हर’ ही संकल्पना ३० शिष्यांनी सादर केली. ‘हरी’ हा पालनकर्ता, तर ‘हर’ हा संहारकर्ता अशा विरोधाभासी रचना या वेळी प्रस्तुत करण्यात आल्या. या प्रसंगी दीपा लागू यांचे ‘नृत्यामध्ये करियर’ यावरील संवाद आणि भारती बर्‍हाटेचे ‘म्युझिक थेरपी’वरचे संवाद विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरले.



पूर्वार्धात अभंग, तर उत्तरार्धात अडू पामबे या रचनांना प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली. या वर्षीचा ‘स्टुडंट ऑफ दी इयर’चा पुरस्कार दर्शना पासकंठी आणि शुभवि जोशी हिला देण्यात आला. शिवांजली डान्स अॅकॅडमीचे विश्वस्त सुहास बाठे, मीनल बाठे, सचिव अभिजीत बाठे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link