Next
मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी
BOI
Thursday, October 04, 2018 | 10:09 AM
15 0 0
Share this article:

मुलांना चांगल्या सवयी लावल्या, तर त्यांचे आयुष्य घडते. चुकीच्या सवयींमुळे आयुष्य बिघडू शकते. म्हणून चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवणे व चुकीच्या घालवणे हे महत्त्वाचे असते. ते कसे साध्य करता येईल, याबाबत मनोज अंबिके यांनी ‘मुलांसाठी १०१ प्रभावी सवयीं’मधून मार्गदर्शन केले आहे. यातील १०१ सवयींविषयी बोलताना प्रत्येक सवय कशी लावावी, हेही सांगितले.

मोठी माणसे काय सांगतात यापेक्षा कशी वागतात, यावरून मुले शिकत असल्याने मोठ्यांचे वागणे प्रथम तपासावे, असा सल्ला देताना सकाळी उठल्यावर अंथरुणाची घडी घालण्याच्या सवयीपासून श्रीगणेशा केला आहे. तीन मिनिटे दात घासण्याची सवय, ताट स्वच्छ करणे, व्यवस्थितपणा, मैदानावर खेळणे, कला जोपासणे, नकार पचविणे, स्वतःचे मत मांडणे, प्रश्न विचारणे, व्यवहारज्ञान शिकणे, रोज लवकर उठण्यापासून दैनंदिन कामे वेळेत व नियमित करणे अशा अगदी छोट्या-छोट्या वाटणाऱ्या; पण सुयोग्य व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आवश्यक सवयी यात आहेत.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाउस
पाने : २१६
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search