Next
‘समाजातील उपेक्षितांना न्याय देणारा अर्थसंकल्प’
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांची प्रतिक्रिया
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 12:17 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी, युवक व व्यावसायिकांना साथ देण्याबरोबरच ओबीसी, धनगर या समाजघटकांना आणि उपेक्षित महिलांना न्याय देणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली.

दानवे म्हणाले, ‘भाजप युती सरकारच्या अर्थसंकल्पात शेतीचा विकास आणि रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, बावीसशे कोटी रुपयांचा कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा विस्तार या बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात १० हजार लघुउद्योग सुरू करणार, प्रत्येक तालुक्यात लघु उद्योग पार्क, ‘ईज ऑफ डुइंग’ बिझनेससाठी विविध तरतुदी, दहावी–बारावी नापासांसाठी रोजगाराभिमुख विशेष कौशल्य योजना अशा तरतुदींमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.’

‘ओबीसींच्या वित्तीय महामंडळाला दोनशे कोटी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतिगृहे आणि विशेष पुरस्कार, ओबीसी मुलींसाठी स्कॉलरशिप, बारा बलुतेदारांच्या सक्षमीकरणासाठी १०० कोटी, धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी, जय मल्हार व्यायामशाळा आणि अहिल्यादेवी होळकर सभागृह योजना, अल्पसंख्य तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रमांसाठी शंभर कोटी आणि विधवा–परित्यक्ता–घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार योजना यांचे आपण स्वागत करतो,’ असे दानवे यांनी नमूद केले.

‘श्रद्धेय अटलजींचे मुंबईत भव्य स्मारक उभारणे आणि त्यांच्या नावाने शहरांमध्ये अटल आनंदवन योजना या घोषणा विशेष महत्त्वाच्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामुळे मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल,’ असे दानवे  यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search