Next
‘कोहिनूर’तर्फे मुंबईत ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’
प्रेस रिलीज
Saturday, May 04, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : कोहिनूर या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेनतर्फे मुंबई इंटरनॅशनल कन्झ्युमर फेअरच्या साह्याने ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१९’ या इलेक्ट्रॉनिक्स महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रीमियम आणि बहुविध प्रकारची उपकरणे आणि गॅझेट्स यांसह असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत बीकेसी येथील एमएमआरडीए ग्राउंड्समध्ये १३ मे २०१९ दरम्यान कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१९ आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात सर्वप्रथम भारतात सादर केली जाणारी २०हून अधिक नवी उत्पादनेही प्रदर्शित केली जातील. टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या स्वयंपाकघर आणि घरगुती वापराच्या वस्तू, लॅपटॉप्स, टॅबलेट्स आणि मोबाइल फोन यांसारख्या गॅझेट्सवर ग्राहकांना सर्वोत्कृष्ट डील्सही येथे मिळतील. ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’च्या या पर्वात अॅमेझॉन, ब्ल्यू स्टार, एमआय, लिनोव्हो, एचपी, सोनी, एलजी, टीसीएल, फिलिप्स, विवो, नोकिया, सॅमसंग, सीमेन्स, लॉइड, आयएफबी, हिताची, युनिलीव्हर, हॅवेल्स यांसारखे ब्रँड्स सहभागी होत आहेत.

या विषयी बोलताना कोहिनूर टेली व्हिडिओचे संचालक विशाल मेवानी म्हणाले, ‘इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सातत्याने नवनवे प्रयोग होत आहेत. आयओटीवरील घरगुती उपकरणांपासून स्मार्ट रेफ्रिजरेटर्स आणि टेलिव्हिजनपर्यंत जे काही सर्वोत्कृष्ट उपलब्ध असेल ते अनुभवण्याचा प्रयत्न ग्राहक सतत करत असतो. ही सगळी नाविन्यता एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी ‘कोहिनूर’ने उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ म्हणजे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो. आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडकडून सर्वांत आधी भारतात उपलब्ध होणाऱ्या २०हून अधिक उत्पादनांचे अनावरण महोत्सवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हा देशातील बहुप्रतिक्षित इलेक्ट्रॉनिक्स महोत्सव ठरला आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search