Next
दुर्मिळ काडेपेट्यांचे प्रदर्शन
प्रेस रिलीज
Thursday, June 07 | 05:25 PM
15 0 0
Share this story

पुणे :  भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या पाहण्याची संधी सध्या पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या दालनातील आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रदर्शन सोमवार वगळता सर्वांना विनाशुल्क सकाळी ११ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पाहण्यासाठी एक जुलैपर्यंत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या असून, यात नावाजलेल्या व्यक्ती (राजकीय, कलाक्षेत्र), फळे, फुले, भाज्या, वाद्य, पेहराव आदी छापांच्या काडेपेट्यांचा समावेश आहे. यातील बहुतेक काडेपेट्या या सुमारे पन्नास ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या आहेत. राजा रविवर्मा यांनी काढलेल्या काही निवडक चित्रांचे छाप काडेपेट्यांवरही छापण्यात आले होते. या प्रदर्शनात अशा तसेच, अन्य दुर्मिळ काडेपेट्याही आहेत.

दुर्मिळ काडेपेट्यांचे प्रदर्शन
स्थळ : पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.
            हॅपी कॉलनी, कोथरूड 
वेळ :  १ जुलैपर्यंत, सकाळी ११ ते सायंकाळी आठ  (सोमवार वगळून)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link