Next
एनसीआरचे स्मॉल फूटप्रिंट एटीएम
प्रेस रिलीज
Monday, February 12 | 12:52 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘एनसीआर कॉर्पोरेशन’ (NYSE: NCR) या ओम्नी-चॅनल सोल्यूशनमधील जगातील आघाडीच्या कंपनीने आठ फेब्रुवारी रोजी ‘सेल्फसर्व्ह सिलेक्ट एडिशन (एसई) कॅश’ आणि ‘एसई रिसायकल’ एटीएमचे अनावरण केले असून, त्यामुळे वित्तीय संस्थांना विस्तार करणे व भारतातील बँकिंग सेवा न मिळालेल्या १९टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला सेवा देणे शक्य होणार आहे. एनसीआरचे हे नवे, आटोपशीर एटीएम तंत्रज्ञान बँकांना दुर्गम, आधी सेवा न मिळणाऱ्या ठिकाणी रोख रक्कम उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयार केले आहे. 

भारतात रोख व्यवहार करण्याचे प्रमाण कमालीचे असून निम्म्यापेक्षा अधिक रिटेल व्यवहार रोख रकमेचा वापर करून केले जातात. एकट्या २०१८ या वर्षामध्ये एटीएममधून १८.५ अब्ज रुपये काढले जातील असा अंदाज आहे. हा आकडा २०२२पर्यंत २६ अब्जापर्यंत वाढेल. एनसीआरच्या ‘सीएक्स बँकिंग’ या ग्राहकांना भौतिक व डिजिटल बँकिंग माध्यमातून उत्तम अनुभव देणाऱ्या सॉफ्टवेअरच्या पाठबळामुळे सिलेक्ट एडिशन एटीएम वित्तीय संस्थांना रोख रक्कम ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचण्यासाठी मदत करतील, तसेच अत्यंत सुरक्षितता, सुधारित कालावधी व सुलभ वापर या सुविधाही देतील. तसेच, साक्षरतेचे आव्हान असलेल्या ग्रामीण भागात ग्राहकांची खातरजमा करण्यासाठी ओळख पटवण्यासाठी बायोमेट्रिकच्या वापरामुळे मोठी सोय व सुलभता निर्माण होईल. 

‘आर्थिक विकासाचा नवा पैलू म्हणून आर्थिक समावेशकता उदयास येत आहे आणि सेवा न मिळणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून व त्यांना सेवा देऊन देशातील गरिबी दूर करण्यामध्ये त्याचे महत्त्वाचे योगदान आहे,’ असे एनसीआर फिनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष व जनरल मॅनेजर जोस रेसेंडिझ यांनी सांगितले. ‘नव्या एटीएममुळे वित्तीय संस्थांना त्यांचे एटीएम जाळे आधुनिक करणे, ग्राहकांना चांगली सेवा देणे व रोख रकमेची मागणी अधिक असलेल्या ठिकाणांपर्यंत विस्तार करणे शक्य होईल,’ असे ते म्हणाले.

एनसीआर एसई रिसायकल एटीएमबरोबरच, एनसीआर ऑप्टिकॅश रोकड व्यवस्थापन व अंदाजविषयक सुविधेमुळे वित्तीय संस्थांना एटीएमची उपलब्धता वाढवणे व रोकड भरण्यासाठी द्यायच्या भेटी कमी करून खर्चामध्ये कपात करणे; तसेच रोकड हाताळण्याचा खर्च व रोकड तशीच पडून राहण्याचा खर्च कमी करणे शक्य होईल. नव्या रिसायकलिंग एटीएममुळे ग्राहकांना व लहान व्यवसायांना अचूक व सुरक्षित पद्धतीने तातडीने रोकड भरता येईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link