Next
अकलूजमध्ये ‘संवाद वारी’
BOI
Monday, July 23 | 02:10 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘राज्य शासनाने शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या योजनांची माहिती प्रामुख्याने संवाद वारी प्रदर्शनात दिली आहे. संवाद वारी शासकीय योजनांचा अतिशय चांगला उपक्रम असून, वारकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अकलूज (ता. माळशिरस) येथे केले.

अकलूज येथील माने विद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवाद वारी उपक्रमातील चित्र प्रदर्शनाला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.

‘राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शासकीय योजना सुरू केल्या आहेत. संवाद वारी उपक्रमातून त्यांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. संवाद वारीच्या माध्यमातून शासन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल,’ असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

पंढरपूर वारीनिमित्त असंख्‍य वारकरी येथे येत असल्‍याने त्‍यांना शेती आणि ग्रामीण विकासाच्‍या योजनांची माहिती व्‍हावी, यासाठी ‘संवादवारी’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्‍हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट दिली. जिल्‍हा माहिती कार्यालयाचा ‘संवाद वारी’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम असल्‍याची प्रतिक्रिया सोलापूरचे जिल्‍हा पोलिस अधीक्षक प्रभू यांनी व्‍यक्त केली.

‘शासनाच्‍या अनेक योजना असून, प्रदर्शनात खास शेतकरी-वारकरी यांच्‍यासाठी असलेल्‍या योजना मांडण्‍यात आल्‍या आहेत. या योजना त्‍यांच्‍यापर्यंत जाण्‍यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होईल,’ असे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रभू यांनी आषाढवारी निमित्त पहिल्‍यांदाच राबविण्‍यात आलेल्या ‘संवाद वारी’ या प्रदर्शनाच्‍या आयोजनाबद्दल त्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून शुभेच्‍छा दिल्‍या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link