Next
मुख्यमंत्री दालन मुलांच्या किलबिलाटाने गजबजले
जागतिक टपाल दिनानिमित्त ठाण्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली पोस्टकार्डस्
प्रशांत सिनकर
Wednesday, October 10, 2018 | 11:12 AM
15 0 0
Share this article:



ठाणे :
‘मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या शाळेला भेट द्याल का?’ ‘आम्हाला नागपूरची संत्री मिळणार का? ‘मला अमृता काकूंचं गाणं खूप आवडतं’....... ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने पोस्टकार्डांवर व्यक्त केलेले विचार वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने दाद दिली. निमित्त होते नऊ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनाचे.



ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या चरई, वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पत्रलेखनाचा उपक्रम हाती घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ती पोस्टकार्डस् या मुलांनी त्यांच्याकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे या शाळेतील या मुलांनी पत्रलेखन उपक्रमात कुणीही न सांगता स्वत:च्या मनाने लेखन केले आहे.



मंत्रिमंडळ परिषदेनंतर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांनी या सर्व मुलांना आपल्या दालनात बोलावले. मग त्यांच्यात आणि मुलांच्यात एक छान संवाद रंगला. मुख्यमंत्र्यांनी मुलांना त्यांच्या आवडी विचारल्या, नावे विचारली. मुलांनीही धीटपणे त्यांच्याशी हस्तांदोलन केले. मुख्यमंत्री दालन हे काही वेळासाठी मुलांच्या किलबिलाटाने गजबजले. मंत्रालयासारख्या भव्य वास्तूत येण्याची आणि मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांकडून मुलांचे तोंड गोड करण्यासाठी बिस्किटाचे पुडेही मिळाले. त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला.   



या मुलांसोबत मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण, नेहा जोशी, प्राचार्या दासदेखील होत्या. संस्थेचे चिटणीस केदार जोशी, अध्यक्ष श्री. बोरवणकर, उपाध्यक्षा नमिता सोमण यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search