Next
वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
BOI
Friday, April 19, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर आजतागायत अधिराज्य गाजवणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, डॉ. वसंतराव देशपांडे यांची जन्मशताब्दी दोन मे २०१९ पासून सुरू होत आहे. यानिमित्त त्यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांनी वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेद्वारे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवाचा शुभारंभ सोहळा रवींद्र नाट्यमंदिर येथे संध्याकाळी पाच ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

‘या सोहळ्यात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, श्रीमती फैयाज, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी इत्यादी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून,कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे,’अशी माहिती आयोजक पंडित चंद्रकांत लिमये यांनी दिली. 


या वेळी ‘वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदिशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका नुपूर काशीद-गाडगीळ व पद्मभूषण प्रभाताई अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.

कार्यक्रमाविषयी :
डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'वसंत बहार' कार्यक्रम 
स्थळ : रवींद्र नाट्यमंदिर
दिवस व वेळ : पाच मे, संध्याकाळी पाच ते दहा.

(ही बातमी इंग्रजीमधून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search