Next
स्मृतिभ्रंश दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती
BOI
Saturday, September 29 | 05:01 PM
15 0 0
Share this storyनाशिक : स्मृतिभ्रंश दिनानिमित्त येथील युवा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्मृतिभ्रंशासंदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. नाशिक रोडच्या सिग्नलवर, तसेच रस्त्यावर हातात पोस्टर घेऊन स्मृतिभ्रंशाची लक्षणे आणि कारणे यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

विसर पडणे, वारंवार त्याच-त्याच गोष्टी बोलणे, दैनंदिन काम करण्यास वेळ लागणे, एकटे राहणे, कमी बोलणे, नवीन विषय समजून घेण्यात अडचणी निर्माण होणे, रस्ते विसरणे, काळाचे भान न राहणे, वस्तूंचे ठिकाण विसरणे यांसारख्या अनेक मानसिकदृष्ट्या अपरिपक्व गोष्टी स्मृतिभ्रंशाची लक्षणे आहेत.

हा आजार चाळिशीनंतर जडण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. नाशिक शहरात या आजाराचे दहा हजारांहून अधिक रुग्ण असून, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या योजनेला व कामाला बळकटी मिळावी या उद्देशाने नीला पंजाबी, मिहिका मेहता, अनिल सिंग, जगबिर सिंह, जयेश गोतीसे यांसह इतर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लोकांना स्मृतिभ्रंशाची कारणे असणारे पत्रके वाटली.

‘स्मृतिभ्रंशासंदर्भात माहिती व्हावी या हेतूने फेसबुक पेज बनवलेले असून, कुणाला हा आजार जडण्याचा धोका असल्यास अथवा मार्गदर्शन हवे असल्यास या फेसबुक पेजवरून माहिती घ्यावी,’ असे आवाहन नीला पंजाबी आणि मिहिका मेहता यांनी केले. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात या संबंधी काही चाचण्या उपलब्ध असून, वैफल्यग्रस्त व्यक्तींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Dilip R.Krishana About 77 Days ago
I m Homeo.physician,I had old age home , since last 2 yrs.I m private care taker for old age person.I m nursing for to Alzymer patient.I like u r work.I m with u
0
0

Select Language
Share Link