Next
‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, November 04 | 05:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन, पुणे महानगरपालिका, सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रीएटेड सोल्यूशन्स, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि गंगोत्री ग्रीन बिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन सोसायटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील गृह संस्था व पुणेकरांना या स्पर्धेत सहभागी होता येत येणार आहे. ज्या गृह संस्था, पुण्यातील नागरिक पाणी, कचरा व ऊर्जा यांचे व्यवस्थापन उल्लेखनीय करतील त्यांना पारितोषिक देण्यात येतील.  

स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेनंतर निरंजन उपासनी, सुचिस्मिता पै व अमर चक्रदेव हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

या स्पर्धेत पुण्यातील जास्तीत जास्त गृह संस्था आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनाचे अध्यक्ष गणेश जाधव, प्रकल्प संचालक गिरीश मठकर, समन्वयक विश्वास लेले यांनी केले आहे.  

उद्घाटनाविषयी :
दिवस : रविवार, पाच नोव्हेंबर २०१७
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : गांधीभवन कमिन्स कंपनीच्या मागे, कोथरूड, पुणे ३८.

स्पर्धेविषयी :

स्पर्धेची नोंदणी : ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत
स्पर्धेचा तयारी कालावधी : १० फेब्रुवारी २०१८
प्रकल्प तपासणी : १० ते २० फेब्रुवारी २०१८
पारितोषिक : २३ फेब्रुवारी २०१८ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link