Next
‘सॅमसंग’ दाखवणार भारतातील फाइव्ह-जी दुनियेची झलक
प्रेस रिलीज
Friday, October 26, 2018 | 11:52 AM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली : येथे होत असलेल्या ‘इंडियन मोबाइल काँग्रेस २०१८’मध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी भारतातील फाइव्ह-जीचे भविष्य दर्शवणार आहे. देशभरातील लोकांवर विविध मार्गांनी फाइव्ह-जीचा कशाप्रकारे परिणाम होईल आणि घर, मैदाने, रस्ते व शेतावरील लोकांचे डिजिटल आयुष्य ‘सॅमसंग’च्या सेवांद्वारे कशाप्रकारे उंचावेल हे कंपनी या वेळेस स्पष्ट करणार आहे.

‘इंडिया मोबाइल काँग्रेस २०१८’मधील कंपनीच्या सहभागाचा एक भाग म्हणून ‘सॅमसंग’च्या नेटवर्क बिझनेस विभागाचे अध्यक्ष आणि प्रमुख योंग्की किम यांनी भारतीय सरकार व उद्योग क्षेत्रातील नामवंत आणि महत्त्वाच्या पाहुण्यांसमोर उद्घाटनपर भाषण केले. ते म्हणाले, ‘डिजिटल इंडियापासून प्रेरणा घेत आणि फोर-जी स्थित्यंतरामुळे नवनवे तंत्रज्ञान आपलेसे करण्याकडे असलेला कल वाढल्याचे आपण पाहात आहोत. आपण फोर-जीचा सक्षम वापर करत आहोत आणि फोर-जीचा आधारस्तंभ म्हणून वापर करत सॅमसंग फाइव्ह-जीसाठी मार्ग खुला करून देत त्याच्या भारत व उद्योगक्षेत्रातील नामवंतांसाठी पूर्ण उपयोग करून देईल.’

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स साउथवेस्ट आशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग म्हणाले, ‘रिलायन्स जिओबरोबर केलेल्या भागिदारीमुळे लाखो लोकांना फायदा होईल आणि त्यांचे दैनंदिन आयुष्य सुखकर होईल. फाइव्ह-जीसाठी आम्ही आखलेला मार्ग भारतासाठी असलेली आमची बांधिलकी दर्शवतो. आम्ही यापुढेही सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये सहभागी राहाणार आहोत.’

२०१२ पासून सॅमसंग भारतीय दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची भागिदार कंपनी राहिली आहे. आयएमसीमधील अध्यक्ष किम यांच्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी सॅमसंगने रिलायन्स जिओबरोबर भागिदारी करून जगातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड आणि अत्याधुनिक फोर-जी एलटीई नेटवर्क उभारल्याचे सांगितले.

दिवाळीमध्ये सॅमसंग ९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत म्हणजेच १.३ अब्ज लोकांपर्यंत फोर-जी एलटीई सेवा पोहोचवेल. फोर-जी आणि फाइव्ह-जी यांच्यात पूल उभारण्यासाठी सॅमसंग उद्योगक्षेत्राचे नेतृत्व करत आहे. ‘सॅमसंग’ने दिल्ली येथे भारतातील पहिली, सर्वाधिक मोठ्या पातळीवरील फाइव्ह-जी चाचणी घेण्याचे नियोजन करत असल्याचेही जाहीर केले. दूरसंचार खात्याच्या सहकार्याने २०१९च्या पहिल्या तिमाहीत ही चाचणी होणार आहे. या कामगिरीपासून प्रोत्साहन घेत ‘सॅमसंग’ भारताला डिजिटल स्थित्यंतराला चालना देण्यासाठी आणि फाइव्ह-जीचे भविष्य उलगडण्यासाठी पाठिंबा देत राहील,’ असे किम यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search