Next
‘जीपी’ला ‘ग्रेटेस्ट सेल्स ग्रोथ इन ल्युब्रिकंट्स’ पुरस्कार
प्रेस रिलीज
Friday, May 18 | 12:07 PM
15 0 0
Share this storyमुंबई : जीपी पेट्रोलिअम्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ल्युब्रिकंट उत्पादक व यूएईतील जीपी ग्लोबल ग्रुपचा (गल्फ पेट्रोकेम) भाग असलेल्या कंपनीने एप्रिल २०१८मध्ये स्पेनमधील माद्रिद येथे झालेल्या ग्लोबल ईएमएआय अॅवॉर्ड्स २०१७मध्ये ‘ग्रेटेस्ट सेल्स ग्रोथ अॅवॉर्ड फॉर रेप्सॉल ल्युब्रिकंट्स’ जिंकला आहे.

‘जीपी पेट्रोलिअम्स’ कार्यरत असलेल्या अन्य बाजारांच्या तुलनेत कंपनीने भारतात रेप्सॉल ल्युब्रिकंट्सच्या विक्रीमध्ये विक्रमी ७४ टक्के इतकी वाढ साध्य केली.

या निमित्त बोलताना, रेप्सॉलचे ल्युब्रिकंट्सचे संचालक ऑरलँडो कार्बो यांनी सांगितले, ‘रेप्सॉलची भारतातील प्रगती उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे आणि हा पुरस्कार म्हणजे त्याचीच पोचपावती आहे. भारतीय बाजारपेठ अतिशय आकर्षक आहे व आम्ही २०१८मध्ये जीपी पेट्रोलिअम्सद्वारे व्यवसाय विस्तार करायचे नियोजन केले आहे.’

‘२०१८-१९मध्ये आम्ही मोटरसायकल, पॅसेंजर मोटर व कमर्शिअल व्हेइकल सेग्मेंटमधील सर्व उत्पादने, तसेच सिंथेटिक ल्युब्रिकंट्स दाखल करणार आहोत. डीलरची संख्या वाढवण्यावर व ग्राहक, मेकॅनिक्स व वर्कशॉप्स यांच्या आणखी जवळ जाण्यावर भर दिला जाणार आहे,’ असे  जीपी पेट्रोलिअम्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरी प्रकाश एम. यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.

‘जीपी पेट्रोलिअम्स’ने सन २०१६मध्ये भारतात रेप्सॉलचा ल्युब्रिकंट व्यवसाय सुरू केला आणि देशातील कार्याच्या दुसऱ्याच वर्षी कंपनीला या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. रेप्सॉलच्या दर्जेदार व सर्वंकष अशा प्रीमिअम गुणवत्तेच्या ल्युब्रिकंट्सचे भारतात उत्पादन व विक्री करण्याचे विशेष अधिकार जीपी पेट्रोलिअम्सकडे आहेत.

रेप्सॉलची प्रसिद्धी करण्यासाठी जीपी पेट्रोलिअम्स लिमिटेडने नेहमीच बाजारात आक्रमकपणे विविध मार्केटिंग उपक्रम राबवले आहेत. अलीकडेच आयोजित केलेल्या उपक्रमात, रायडर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेप्सॉल ब्रँडेड विशेष हेल्मेट दाखल करण्यात आली. या उपक्रमाचीही दखल ईएमएआय पुरस्कारांमध्ये घेण्यात आली. ‘जीपी पेट्रोलिअम्स’ तेलासंबंधी सहयोग करण्यासाठी सातत्याने विविध ओईएमशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत असते, त्याचबरोबर जागतिक बाजारानंतर भारतासाठी मार्केटिंग उपक्रमांचीही आखणी सुरू असते.

यापूर्वी, रेप्सॉल ल्युब्रिकंट्सने जीपी पेट्रोलिअम्सद्वारे बीटीव्हीआयवरील शिफ्टिंग गिअर्स नावाच्या एका चॅट शोवर हजेरी लावली आहे व ऑटो क्षेत्रामध्ये विस्तार करण्यासाठी कमर्शिअल व्हेइकल्स पुरस्कार प्रायोजित केले आहेत. बाजारात पुरेशी प्रसिद्धी करण्यासाठी रिटेल बाजारात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात व त्यामुळे रेप्सॉलला सतत ग्राहकांच्या स्मरणात व समोर राहण्यासाठी मदत होते. बीएस सहा कम्प्लाइन इंजिनसाठी प्रीमिअम दर्जाची उत्पादने पुरवण्यासाठी जीपी पेट्रोलिअम्स लिमिटेड रेप्सॉल ल्युब्रिकंट्सच्या मदतीने सज्ज होत आहे.

७०हून अधिक देशांत रेप्सॉल ल्युब्रिकंट्सचे व्यावसायिकरण करण्यात आले आहे आणि उत्पादने मोठी मागणी असलेल्या गुणवत्ता मापदंडांची पूर्तता करतात. ही प्रीमिअम उत्पादने ‘जीपी पेट्रोलिअम्स’ने आधुनिक चाचणी सुविधांचा वापर करून व रेप्सॉलने प्रमाणित केलेल्या गुणवत्तेविषयी कठोर मापदंडांनुसार, भारतातील आपल्या उत्पादन प्रकल्पांमध्ये निर्माण केली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link