Next
होंडा ‘नाव्ही’ने पार केला एक लाख विक्रीचा टप्पा
प्रेस रिलीज
Friday, August 17 | 04:07 PM
15 0 0
Share this story

गुरुग्राम : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ची संपूर्ण भारतीय बनावटीची मोटारसायकल ‘होंडा नाव्ही’ने एक लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. ‘होंडा नाव्ही’ ही होंडाच्या भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात तयार केलेली पहिली शंभर टक्के भारतीय गाडी असून, तिच्या संकल्पनेपासून व्यावसायिक उत्पादनापर्यंतचे सर्व काम भारतातच करण्यात आले आहे. ‘ऑटो एक्स्पो २०१६’ मध्ये  ही मोटारसायकल प्रथम सादर करण्यात आली होती. 

आता ही मोटारसायकल यंदा ‘डोमिनिकन रिपब्लिक’ आणि ‘कोस्टा रिका’ या दोन नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या दहा देशांमध्ये ‘नाव्ही’ची निर्यात केली जाते.

या विक्रमी कामगिरीबद्दल कंपनीच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘ट्रेंडी ‘नाव्ही’ ही तरुणांसाठी अनोखे स्टाइल स्टेटमेंट तयार करणारी ट्रेंडसेटर गाडी आहे. अभिनव डिझाइन, लूक्स आणि आपल्या आवडीप्रमाणे बदल करण्याची अमर्याद क्षमता यामुळे केवळ भारतातीलच नव्हे; तर जगभरातील दुचाकीप्रेमींना तिने भुरळ घातली आहे. तिच्या नव्या आवृत्तीमध्ये स्टायलिश फ्युएल गॉज, मेटल मफलर प्रोटेक्टर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली असून, ती रेंजर ग्रीन आणि लडाख ब्राउन अशा दोन नव्या रंगात  मध्ये उपलब्ध आहे. त्याला ग्रॅब रेल, हेडलाइट कव्हर, रिअर व्ह्यू मिरर्स, स्पोर्टी लाल रंगाचे कुशन्स अशा वैशिष्ट्यांची जोड देण्यात आली आहे.’ 

‘स्टँडर्ड नाव्ही पॅट्रिअट रेड, शास्ता पांढरा, स्पार्की ऑरेंज, ब्लॅक, न्यूरेंजर ग्रीन, न्यू लडाख ब्राउन अशा सहा रंगांत उपलब्ध आहे’,  असेही त्यांनी नमूद केले.

‘होंडा नाव्हीला १०९ सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सात हजार आरपीएमवर आठ पीएस देते आणि ट्यूबलेस टायर्ससह ५५०० आरपीएममध्ये ८.९६ एनएम टॉर्क देते. गाडीला पुढे वरून खालच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक मोनोशॉक बसवण्यात आले आहे. ‘नाव्ही’ची किंमत ४४ हजार ७७५ रुपये  (एक्स शोरूम दिल्ली) आहे’, असेही गुलेरिया यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link