Next
‘थ्रीएम इंडिया’चा ‘फ्रॉम यू टू हर’ उपक्रम
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : मुलींच्या सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी ‘थ्रीएम इंडिया’ने के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट आणि रिलायन्स स्मार्ट स्टोअर्सबरोबर भागीदारी करत ‘फ्रॉम यू टू हर’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. यात शहरातील मुले ... त्यांनी स्वत: बनवलेल्या हस्तकला वस्तू आणि वैयक्तिक संदेशासह ‘नन्ही कली’ला तिच्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देणार आहेत.

हा उपक्रम राबवण्यासाठी ‘थ्रीएम इंडिया’ने यंदा ‘बॅक टू स्कूल’ हंगामादरम्यान निवडक ‘रिलायन्स स्मार्ट’मध्ये हस्तकला शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये शहरांतील मुलांनी तयार केलेल्या वस्तू त्यांच्या वैयक्तिक संदेशासह महाराष्ट्रातील ‘नन्ही कली’ शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘बॅक टू स्कूल’ म्हणजे पुन्हा एकदा शाळेत प्रवेश करताना मुलींना स्वागताची भेट म्हणून दिल्या जातील.

या भेटीची परतफेड म्हणून ‘नन्ही कली’तर्फे मुलींनी स्वत:च्या हातांनी लिहिलेले आभाराचे पत्र पाठवले जाईल. हस्तकला शिबिरात भाग घेतलेल्या मुलांना ही पत्रे दिली जातील. भारताच्या ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलींबद्दलची आस्था आणि त्यांच्याबद्दलचा आपलेपणा या भावनांना चालना देण्यासाठी या तीन संस्थांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला आहे. यासाठी शहरात राहणाऱ्या मुलांना हे अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘बॅक टू स्कूल’मधील या शुभेच्छांसोबतच ‘थ्रीएम इंडिया’ने आणखी एक पाऊल उचलले आहे. फरिदाबाद, मुंबई आणि बेंगळुरू या शहरातील ‘रिलायन्स स्मार्ट’मध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ‘थ्रीएम’ स्टेशनरी उत्पादनामागे एक रुपया मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे.

‘बॅक टू स्कूल’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ‘थ्रीएम-नन्ही कली’ भागीदारीचा पाया रचणाऱ्या ‘थ्रीएम इंडिया’च्या माजी व्यवस्थापकीय संचालक देबरती सेन म्हणाल्या, ‘मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी यंदा आम्ही या उपक्रम ग्राहकांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. भारतातील शेकडो घरांपर्यंत हा उपक्रम घेऊन जाण्यात आम्हाला साह्य करणाऱ्या ‘रिलायन्स स्मार्ट’सोबतच्या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे.’

‘थ्रीएम इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रमेश रामदुराई म्हणाले, ‘अधिक सहानुभूती जपणारा समाज निर्माण करणे हा ‘बॅक टू स्कूल’चा उद्देश आहे आणि ‘नन्ही कली’सोबतच्या आमच्या भागीदारीतून वंचित मुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्यास आम्ही बांधिल आहोत.’

महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त आणि कार्यकारी संचालक शीतल मेहता म्हणाल्या, ‘शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके वाचणे आणि परीक्षा देणे इतकेच नाही. शिक्षण म्हणजे समाजाच्या एकात्मिक प्रगतीचे एक माध्यम आहे आणि त्यासाठी आपल्या मुलींना आणि मुलांना शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘नन्ही कली’ प्रकल्पात आमच्या ‘यलो टॅबलेट्स’ आणि ‘फन ग्रुप’च्या उपक्रमातून मुलींसाठी शक्य तितक्या आनंददायी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने शैक्षणिक पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘थ्रीएम’च्या ‘फ्रॉम यू टू हर’ या उपक्रमासाठी भागीदारी करताना आम्हाला आनंद झाला आहे. या उपक्रमामुळे छोट्या मुलींचा शिक्षणातील उत्साह जपता येईल; तसेच अधिक सुस्थापित पार्श्वभूमी लाभलेल्या लहान मुलांमध्ये सहभावना जागवण्यात यामुळे साह्य होणार आहे.’

रिलायन्स रिटेल व्हॅल्यू फॉरमॅटचे (ग्रोसरी रिटेल) मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदार माल म्हणाले, ‘आमचे स्टोअर्स त्यांच्या आसपासच्या समाजाचा एक हिस्सा असतात. मुलींच्या शिक्षणासंदर्भात आमच्या नागरी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढवून त्यांचा सहभाग नोंदवणाऱ्या या प्रकल्पात ‘थ्रीएम’ टीमची साथ लाभल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search