Next
‘फरेरो’च्या ‘सीएसआर’ अहवालाचे भारतात प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, May 28 | 05:42 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्लीतील इटलीच्या दूतावासात फरेरोच्या जागतिक सीएसआर अहवालाचे प्रकाशन करताना (डावीकडून) इंदर चोप्रा, अमिताभ कांत, लॉरेंझो अँजेलोनी, स्टेफानो पेल्ले.

नवी दिल्ली : सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व बिझनेस पार्टनर यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी ‘फरेरो’च्या शेअरिंग व्हॅल्यूज टू क्रिएट व्हॅल्यू यावरील आठव्या जागतिक सीएसआर अहवालाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमाचे आयोजन इटलीच्या दूतावासामध्ये केले होते व त्यासाठी इटलीचे राजदूत माननीय लॉरेंझो अँजेलोनी व फरेरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो पेल्ले उपस्थित होते.

याविषयी बोलताना निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले, ‘फरेरो इंडियाचा भारताशी असलेला सहयोग दशकाहून जुना आहे आणि त्यांनी आमच्या देशासाठी दिलेले योगदान खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे. त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे बारामतीचे रूपांतर भरभराट होणाऱ्या औद्योगिक केंद्रामध्ये झाले आहे. एक ब्रँड म्हणून फरेरो गुणवत्ता व वैशिष्ट्यपूर्ण यांचे प्रतीक आहे. जागतिक संस्थेबरोबर जोडले जात असल्याचा मला आनंद होत आहे आणि मला त्यांच्या बारामती येथील प्रकल्पाला भेट द्यायला आवडेल. फरेरो ही कंपनी यशाचे मापन करण्यासाठी केवळ बॅलन्सशीटच्या पुढे जाऊन विचार करते.’

याविषयी मत व्यक्त करताना इटलीचे राजदूत माननीय लॉरेंझो अँजेलोनी म्हणाले, ‘सलग दुसऱ्या वर्षी फरेरोच्या जागतिक सीएसआर अहवालाचे आयोजन करणे, हे आमचे भाग्य आहे. बारामती प्रकल्पातील व परिसरातील समाजाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने कंपनीने आयोजित केलेल्या सीएसआर उपक्रमांचा आम्हाला अभिमान वाटतो. फरेरो इंडिया हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचे खऱ्या अर्थाने प्रतिक आहे.’

यानिमित्त मत व्यक्त करत असताना फरेरो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक स्टेफानो पेल्ले यांनी सीएसआर उपक्रमांविषयी विचार व्यक्त केले व ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाविषयी कंपनीशी असलेली बांधिलकी व्यक्त करून ते म्हणाले, ‘भारतातील बारामती प्रकल्पातील मिशेल फरेरो आंत्रप्रिन्युअल प्रोजेक्टद्वारे आम्ही कमी विकसित परिसरांत नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि प्रशिक्षण व कौशल्ये पुरवली आहेत आणि त्यानिमित्ताने समाजामध्ये खऱ्या अर्थाने शाश्वत विकास साधला आहे. आमचा प्रकल्प असलेल्या क्षेत्रात, आम्ही आरोग्याची देखभाल व बालकांसाठी शिक्षण यांना चालना देणाऱ्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देतो.’

‘फरोरोच्या भारतातील वाटचालीला नुकतीच सुरुवात झाली आहे,’ असे म्हणून पेल्ले यांनी सांगितले, ‘गेल्या ११ वर्षांमध्ये आम्ही आमचे सहर्ष स्वागत केलेल्या या सुंदर देशाप्रती आमची बांधिलकी व कृतज्ञता म्हणून काही महत्त्वाचे उपक्रम राबवले आहेत. येत्या काही वर्षांमध्ये आम्ही आणखी बरेच काम करणार आहोत.’

‘फरेरो’ने भारतातील ११व्या वर्षामध्ये, सुरुवातीच्या बांधिलकीच्या सातपट अधिक रक्कम आधीच गुंतवली आहे आणि असंख्य लोकांना रोजगारही दिला आहे. बारामतीमध्ये प्रकल्प सुरू करत असताना अपेक्षित असलेल्यापेक्षा हे प्रमाण बरेच मोठे आहे. फरेरो समूहाकडील भारतातील मनुष्यबळ इटली व जर्मनी या देशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे आणि भारतातील प्रकल्पातील जवळजवळ ५० टक्के कर्मचारी या महिला आहेत.

‘फरेरो’ने २०२०साठी निश्चित केलेली उद्दिष्टे ‘फरेरो’च्या आठव्या सीएसआर अहवालात नमूद केली असून, व्यवस्थापकीय स्थानांवरील महिलांची संख्या वाढवणे व शाश्वत जागतिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक करत राहणे, ही त्यातील ठळक उद्दिष्टे आहेत. फरेरो फाउंडेशनमधील भर आणि भारत, कॅमेरून व दक्षिण आफ्रिका येथील मिशेल फरेरो आंत्रप्रिन्युरिअल प्रोजेक्ट्स हे मुख्य यश आहे. कंपनीने जगभरातील सर्व २२ समूह उत्पादन प्रकल्पांसाठी FSSC २२००० फूड सेफ्टी सर्टिफिकेशन मिळवले आहे.

जागतिक सीएसआर अहवालातून ‘फरेरो’ची भारतातील, तसेच कंपनीचे उत्पादन सुरू असलेल्या अन्य २२ देशांतील लोकांप्रती, पर्यावरणाप्रती व व्यवसायाच्या व्यवस्थेविषयी बांधिलकी स्पष्ट होते.

‘फरेरो इंडिया’विषयी :
‘फरेरो’ ही चॉकलेट आणि कॉन्फेक्शनरी उत्पादनांची इटालियन उत्पादक कंपनी आहे. या समूहाची वार्षिक उलाढाल १२ अब्ज डॉलर असून, समूह जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चॉकलेट व कॉन्फेक्शनरी उत्पादन निर्माता आहे. फरेरो इंडियाचे कॉर्पोरेट कार्यालय पुणे येथे आहे आणि कंपनी भारतातील सर्व महानगरे, लहान महानगरे येथे कार्यरत आहे व कंपनीचे सक्षम वितरण जाळे आहे. प्रादेशिक कार्यालये मुंबई, दिल्ली, कोलकाता व चेन्नई येथे आहेत. फरेरो रॉशर, किंडर जॉय, किंडर शॉको-बॉन्स क्रिस्पी, न्यूटेला आणि टिक टॅक हे ‘फरेरो’चे भारतातील काही लोकप्रिय ब्रँड आहेत.

कंपनीने २००४मध्ये व्यावसायिक कार्य सुरू केले आणि २००७मध्ये महाराष्ट्र सरकारने ‘फरेरो’ला भव्य प्रकल्प दिला. दशकाहूनही कमी कालावधीत ‘फरेरो’ ही भारतातील चॉकलेट व कॉन्फेक्शनरी क्षेत्रातील नावाजलेली कंपनी बनली आहे. कंपनीने आशिया व मध्य पूर्वेसाठी भारत हे उत्पादन केंद्र म्हणून विकसित केले आहे आणि स्थानिक उत्पादनांपैकी निम्मे उत्पादन निर्यात केले जाते.

कंपनीने महाराष्ट्रातील बारामती येथे सर्वात मोठा रूफटॉप सोलार प्रकल्प बसवला आहे व त्याची क्षमता १.५ मेगावॅट आहे आणि त्यामध्ये आजवर २२५० MWh वीजनिर्मिती केली आहे. ८.८ कोटी रुपये (१.२ दशलक्ष युरो) गुंतवणूक असलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पात अंदाजे दोन हजार घरांना दररोज वीज देण्याची आणि दरवर्षी १.९२६ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे. आज, ग्लोबल रेप्युटेशन इंडेक्स २०१७नुसार ‘फरेरो’ ही प्रतिष्ठेच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. जगभरातील १०० सर्वोत्तम कंपन्यांमध्ये तिचा क्रमांक १७वा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link