Next
रेणुका प्रतिष्ठानतर्फे ‘देहदान- अवयवदान’वर कार्यक्रम
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 02:00 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रेणुका प्रतिष्ठानतर्फे ‘देहदान- अवयवदान’ या विषयावरील कार्यक्रम २७ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत झाडगाव येथील माधवराव मुळे भवनात आयोजित केला आहे. 

देहदान ही सध्याच्या काळातील महत्त्वाची गरज आहे; परंतु अद्यापही या बाबतीत लोकांना फार कमी माहिती असून, या विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून रेणुका प्रतिष्ठानने माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बेंगळूरू येथील तज्ज्ञ श्रीकांत आपटे, नीला आपटे हे देहदान-अवयवदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी डेरवण येथील वालावलकर मेडिकल कॉलेजच्या डॉ. मोनाली सोनावणे आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत कार्यवाहिका सुनंदा देवस्थळी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विद्या पटवर्धन व सचिव मानसी डिंगणकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : शनिवार, २७ एप्रिल २०१९ 
वेळ : सायंकाळी पाच ते सात 
स्थळ : माधवराव मुळे भवन, झाडगाव, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search