Next
पिंपरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 03:54 PM
15 1 0
Share this story

पिंपरी : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सात एप्रिलला येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २८ एप्रिल २०१८ पर्यंत (रविवार बंद) सुरू राहील.

यामध्ये दमा, हृदयरोग, श्वसनासंदर्भातील विकार, मधुमेह, पोटाचेविकार, मानसिक आजार, मेंदूविकार, मूळव्याध, हर्निया, मुतखडा, व्हेरीकोजवेन्स, अपेंडिक्स, विविध प्रकारच्या गाठी, टॉन्सिल्स, हायड्रोसिल, गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार, स्त्रियांचे विकार, स्तनाचे रोग, मासिक पाळीच्या समस्या, मातृ वंध्यत्व, पांढरे जाणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मॅमोग्राफी, पॅपस्मियर - कर्करोग तपासणी आणि बालकांचे विकार उंची व वजन न वाढणे, कुपोषण, भूक न लागणे, सतत रडणे, पोटदुखी, जंत, आकडी येणे आदी व्याधींची मोफत तपासणी व डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. याचबरोबर पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात रुग्णाच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनकार्ड सोबत आणावे.

‘सर्वांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

शिबिराविषयी :
कालावधी : सात ते २८ एप्रिल २०१८
वेळ : सकाळी १० ते दुपारी तीन वाजेपर्यंत
स्थळ : डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. राजेश सिंग- ९८६०१ ८८४०६, (०२०) २७८० ५९००.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link