Next
२५ वर्षांनी ‘बिग बी’ मराठी चित्रपटात
‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात दिसणार विक्रम गोखलेंच्या मित्राच्या भूमिकेत
BOI
Wednesday, May 22, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

अमिताभ बच्चनमुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे तब्बल २५ वर्षांनंतर एका मराठी चित्रपटात दिसणार आहेत. बिग बी यांच्या तमाम मराठी चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात ते अभिनेते विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

२० मे पासून या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबईत सुरू झाले असून अमिताभ बच्चन यांनी पहिल्या चित्रिकरणात सहभाग घेतला. बिग बी यांच्या मराठी सेटवरच्या आगमनाने सेटवरचे वातावरण प्रफुल्लित होते. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत ‘बिग बीं’ची अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये असून त्यांच्या चित्रिकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. 

पुणे आणि मुंबई याठिकाणी चित्रपटाचे बरेचसे चित्रिकरण होणार आहे. चित्रपटात दोन गाणीही आहेत. अमिताभ बच्चन, विक्रम गोखले यांच्या व्यतिरिक्त अभिनेता सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

यापूर्वी १९९४मध्ये अमिताभ बच्चन यांनी श्रीधर जोशी दिग्दर्शित ‘अक्का’ या मराठी चित्रपटात काम केले होते. यामध्ये त्यांच्यासोबत जया बच्चनदेखील होत्या. त्यानंतर २००९मध्ये आलेला उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित विहीर चित्रपटाची निर्मिती ‘बिग बी’ यांनी केली होती. त्यांच्या ‘ए. बी. सी. एल.’ या कंपनीमार्फत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ते या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सृष्टीशी जोडले गेले आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search