Next
‘एमआयडीसी’लाही सातवा वेतन आयोग लागू होणार
संचालक महामंडळाच्या बैठकीत निर्णय
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 03:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक जानेवारी २०१६पासून पूर्वलक्षी प्रभावाने याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्याचे उद्योगमंत्री तथा ‘एमआयडीसी’चे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक ११ फेब्रुवारी २०१९ रोजी झाली. यामध्ये सर्वांनुमते कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ‘एमआयडीसी’ला अंदाजे १३० कोटी रुपये अदा करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

प्रतिनियुक्तीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यावर या वेळी निर्णय घेण्यात आला. त्यांच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याची शासनाला शिफारस केली जाणार आहे. इतर कर्मचाऱ्यांची थकबाकी एकरकमी रोख स्वरूपात देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या शिवाय महामंडळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम-समान वेतन या तत्त्वावर वेतनवाढ व इतर लाभ देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊन कार्यवाहीच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link