Next
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
BOI
Thursday, January 17, 2019 | 11:31 AM
15 0 0
Share this article:



उदगीर :
प्रसाद कुमठेकर यांनी लिहिलेल्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच उदगीर (जि. लातूर) येथे झाले. उदगीर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या चाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनात ‘म्हणून मी लिहिते – लिहितो’ या परिसंवादात हे प्रकाशन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, डॉ. वैशाली किन्हाळकर, बालाजी सुतार, मोहिब काद्री, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्या प्रकाशन झाले. पार पब्लिकेशनतर्फे ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे.

‘उदगीर आणि उदगिरी बोली एवढेच नव्हे, तर या जगण्यातील बारकावे प्रसादने ज्या ताकदीने टिपलेले आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आणि मुळातून वाचण्यासारखे आहे,’ असे उद्गार शेषराव मोहिते यांनी या वेळी काढले.

या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने मराठीतील अनेक साहित्यिकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘मानवी जगण्याच्या तळाशी जाऊन अतिशय संवेदनशीलतेने लेखक जे मोलाचे सांगू पाहत आहे, ते अतिशय उत्कट आणि प्रामाणिक वाटते. महत्त्वाचे म्हणजे ज्या भागातील जगणे लेखक मांडतो, ते तिथल्याच उदगिरी बोलीभाषेचा आणि मातीचा अस्सल गंध घेऊन अभिव्यक्त होते. हे या लेखनाचे बलस्थान वाटते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख यांनी मांडले आहे.

‘परस्परांविषयीचा मत्सर, अविश्वास कायम ठेवून एखादा डोलारा सांभाळण्यापेक्षा सरळ तुकडा पाडून मोकळं झालेलं बरं असं वाटणारी ‘आजची’ पिढी नव्या जाणिवेसह इथं आढळते,’ असे मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आसाराम लोमटे यांनी व्यक्त केले आहे. 

त्याशिवाय वीणा गवाणकर, डॉ. रा. रं. बोराडे, जयंत पवार, आनंद विंगकर, समर नखाते, डॉ. दत्ता घोलप, संजय भास्कर जोशी, नितीन वैद्य आदी मान्यवरांनीही ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. 

(महेश लीला पंडित यांनी केलेले या कादंबरीतील ‘येडी बाभळ’ या पहिल्या प्रकरणाचे अभिवाचन पाहा सोबतच्या व्हिडिओत. ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search