Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचा जर्मन दौरा
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 03:36 PM
15 0 0
Share this story

जर्मनी येथील हॉफ युनिव्हर्सिटी येथे निवड झालेले ‘डीकेटीई’चे ११ विद्यार्थी

इचलकरंजी : जर्मनी येथील हॉफ युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस या विश्‍वविख्यात विद्यापीठामध्ये ‘डीकेटीई’मधील टेक्स्टाइलच्या ११ विद्यार्थ्यांची उन्हाळी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ‘हॉफ’द्वारे या सर्व विद्यार्थ्याची युरोप खंडात मोफत अ‍ॅकोमडेशनची सोय केली आहे. ‘डीकेटीई’च्या हॉफ युनिव्हर्सिटी यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या कराराअंतर्गत गेली चार वर्षे टेक्स्टाइलचे विद्यार्थी शिष्युवृत्तीसह उन्हाळी प्रशिक्षण संपादन करण्यासाठी जात आहेत.

‘डीकेटीई’चे ११ विद्यार्थी हॉफ युनिव्हर्सिटीत प्रशिक्षणासाठी रवाना होत आहेत. त्यांना ‘हॉफ’मधून स्काइपद्वारे इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन मिळत आहे. आजपर्यंत ‘डीकेटीई’च्या तब्बल ३९ विद्यार्थ्यांची या करारांतर्गत जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थी जर्मनी येथील रिसर्च इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीजना भेटी देतील. तेथील वस्त्रोद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचे अभ्यास करण्याची संधी देखील या निमंत्रणामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 
हॉफ युनिव्हर्सिटीने देशातील विविध इन्स्टिट्यूटना भेटी देऊन इच्छुक विद्यार्थ्यांची विविध चाचणीद्वारे बौद्धिक पातळी व संशोधन वृत्ती तपासली व जगातून ३० विद्यार्थ्यांची जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवड केली व त्यातील ‘डीकेटीई’चे ११ विद्यार्थी आहेत. नीलेश जगवानी, विवेक पाटील, भगवान वरखा मोहंमद इस्माईल, संकेत व्हनुगरे, सारिका वडगे, मंथन चाळके, सलीला थिटे, मयुरेश मेटे, राहुल साळुंखे, ओमकार बुधे, कुशल लाहोटी अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्यांना टेक्निकल टेक्स्टाइल्स, इनोव्हेटीव्ह टेक्स्टाइल्स फिनिशिंग, सस्टेनेबल टेक्स्टाइल्स बिझनेस या विषयावर प्रशिक्षण कालावधीमध्ये अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये ‘डीकेटीई’ नेहमी अग्रेसर असते. प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता यामुळे कंपनीचे अधिकारी विशेष प्रभावित होतात व त्यामुळेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थेट नोकरीसाठी घेण्याचे संकेतही देतात. अशाप्रकारे ‘डीकेटीई’ने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना युरोप खंडामध्ये विनाखर्च उच्च प्रशिक्षणाची सोय केल्यामुळे ‘डीकेटीई’ची शैक्षणिक क्षेत्रात असणारी गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गगनभरारी सिद्ध होत आहे.  

संस्थेचे व्हाइस चेअरमन व माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link