Next
कर्वे समाज सेवा संस्थेत ‘एमएसडब्ल्यू’ अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Monday, May 06, 2019 | 02:15 PM
15 0 0
Share this article:


पुणे : समाजकार्याशी निगडित व्यावसायिक, सामाजिक कौशल्ये शिकविण्याच्या हेतूने कर्वे समाज सेवा संस्थेत समाजकार्य पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमएसडब्ल्यू) सुरू केल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर यांनी दिली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या या ‘एमएसडब्ल्यू’ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात कर्वे समाज सेवा संस्थेत झाली आहे. दोन वर्षांच्या या पूर्णवेळ अभ्यासक्रमात कुटुंब व बाल कल्याण, मानव संसाधन व्यवस्थापन, वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य आणि शहरी व ग्रामीण समुदाय विकास या चार स्पेशलायझेशनचा समावेश आहे. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. 

‘एमएसडब्ल्यू’ पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शासकीय, खासगी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक विविध क्षेत्रांत बऱ्याच व्यावसायिक व नोकरीच्या संधी उपलब्ध असून, सामाजिक विकास, कुटुंब व बाल कल्याण संस्थामध्ये समुपदेशक, समन्वयक, मानव संसाधन व्यवस्थापनात, कामगार कल्याण किंवा कार्मिक प्रबंधक, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य, हॉस्पिटल, सल्ला मार्गदर्शन केंद्र, शहरी व ग्रामीण समुदाय विकास प्रकल्प, सीएसआर प्रकल्प अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन संस्था आदी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत,’ असे डॉ. वलोकर यांनी सांगितले.  

प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी वेबसाइटवर व महाविद्यालयात उपलब्ध असून, अर्ज डाउनलोड करून महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश अर्ज जमा करता येतील. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख १९ जून २०१९ असून, प्रवेश परीक्षा २५ जून २०१९रोजी आणि मुलाखत व गट-चर्चा २७ जून २०१९ तारखेला आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी २०१९मध्ये पदवी परीक्षा दिली आहे ते विद्यार्थीसुद्धा प्रवेश अर्ज भरून प्रवेश परीक्षा देऊ शकतात. 

अधिक माहितीसाठी पत्ता : कर्वे समाज सेवा संस्था, १८, हीलसाइड, कर्वेनगर, पुणे- ४११०५२, 
संपर्क क्रमांक : ७५१७५ ६४२१०, ७५१७८ ३५४३१
प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी : http://karve-institute.org/admission
ई-मेल : kinsspune@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search