Next
सोन्यावरील आयातशुल्क वाढ मागे घेण्याची मागणी
सराफी उद्योगाची प्रतिक्रिया
BOI
Saturday, July 06, 2019 | 11:54 AM
15 0 0
Share this article:


अनंत पद्मनाभनअनंत पद्मनाभन, अध्यक्ष ऑल इंडिया ज्वेलरी अँड जेम्स असोसिएशन :

‘केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयातशुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दागिन्यांच्या किंमती वाढणार आहेत. याचा परिणाम विक्रीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या तस्करीला;तसेच बेकायदेशीर व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल. या उद्योगात तब्बल ५५ लाख कारागीर आहेत. त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होईल. ही बाब सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी विसंगत आहे. त्यामुळे सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात केलेली वाढ मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे’.

टी. एस. कल्याणरामन
टी. एस. कल्याणरामन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कल्याण ज्वेलर्स :

‘आम्ही या अर्थसंकल्पाकडे सकारात्मकपणे पाहात आहेत, कारण त्यात जाहीर करण्यात आलेली विविध प्रकारची धोरणे सरकार ग्राहकांना वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेल्या सवलतींच्या मदतीने या क्षेत्राच्या विकासासाठी पाया रचण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. आधार आणि पॅन कार्ड या दोन्हींच्या समान वैधतेमुळे ग्राहकांना दागिन्यांसारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना लक्षणीय मदत होणार आहे. सोन्यावरील आयातशुल्क १० टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांवर गेल्यामुळे सोने खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजारपेठेतील सोन्याच्या बेकायदेशीर पुरवठ्यात वाढ होईल’.

‘मूलभूत सुविधांसाठी प्रस्तावित १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक लक्षात घेता, पायाभूत सुविधा क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे, त्यामुळे ग्राहकांकडे खर्चासाठी जास्त रक्कम राहील आणि अशावेळेस मौल्यवान रत्ने व दागिने उद्योग क्षेत्रातील नफ्यासह परताव्यांचा आकर्षक गुंतवणूक पर्याय त्यांच्यापुढे असेल. त्याशिवाय एनआरआय आणि एफपीआय (परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार) यांचे एकत्रीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे भारतातील एनआरआय फंडिंग वाढून अर्थव्यवस्थेत भांडवलाचा नवा ओघ सुरू होईल. ही चांगले दिवस येणार असल्याची नांदी आहे. एकंदरीतच अर्थसंकल्पातील धोरणे प्रामुख्याने सरकारच्या मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया आणि भारतात व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती करणे यांसारख्या योजनांकडे झुकणारी आहेत,’ असेही  कल्याणरामन यांनी नमूद केले.

सौरभ गाडगीळसौरभ गाडगीळ, अध्यक्ष पीएनजी ज्वेलर्स आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन :
 
‘सोने आणि मौल्यवान धातूंवरील आयातशुल्कात वाढ केल्याने या बाजारपेठेवर काहीसा चिंताजनक परिणाम होणार आहे;मात्र डिजीटलायझेशनला प्रोत्साहन व रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वळण्याच्या पावलांमुळे या उद्योगातील संघटित संस्थांचे हात मजबूत होतील, व्यवहारांत पारदर्शकता येईल आणि बाजारपेठेच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम घडेल. वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न मर्यादेतील लोकांसाठी शून्य कर उत्तरदायित्व लागू करणे हे आमच्या व्यवसायाच्या मध्यम व लहान शहरांतील विस्तारासाठी सुसंगत असून, एकूणच या उद्योगासाठी शुभचिन्ह ठरेल.’

नितीन अष्टेकर
नितीन अष्टेकर, सचिव, पुणे सराफ असोसिएशन :

‘सोने व इतर मौल्यवान धातूंच्या आयातीवरील शुल्क वाढविण्यात आल्याने सोने व सोन्याचे दागिने नक्कीच थोडे महाग होतील; परंतु भारतीय संस्कृतीत सोन्याला असलेले महत्त्व लक्षात घेता या शुल्क वाढीचा सोने खरेदीवर फारसा परिणाम होणार नाही असे वाटते’.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search