Next
‘डेल’ची गेमिंग हार्डवेअरमध्ये नवीन श्रेणी
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील गेमिंगचा वाढता प्रसार लक्षात घेऊन आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण असा गेमिंग अनुभव देण्यासाठी ‘डेल’ने गेमिंग हार्डवेअरमध्ये नवीन श्रेणीच्या सुरूवातीची घोषणा केली. यामध्ये एलियनवेअर १५ आणि १७ तसेच डेल जी सीरीजमधील जी थ्री आणि जी सेव्हनबरोबरच ‘इन्स्पिरॉन २४ ५००० ऑल इन वन’चा समावेश आहे. विविध प्रकारच्या वापकर्त्यांच्या म्हणजेच हौशी गेमर्सबरोबरच गेमिंगमधील व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘डेल’ची ही आणखी एक शृंखला आणण्यात आली आहे.  

या नवीन रेंजचे डिझाइन आणि इंजिनरिंग ज्यांना अधिक कार्यक्षमता आवश्यक असते व गेमर्ससाठी उपयुक्त असते अशांसाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये चांगले कुलिंग आणि आठव्या पिढीतील इंटेल कोअर प्रोसेसर्स असून, त्याचबरोबर सडपातळ डिझाइन असल्याने चांगला गेमिंग अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी डेल जी सिरीज सुरू करण्यात आली आहे. २० हून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या एलियनवेअरमध्ये भर घालत एलियन वेअर लॅपटॉप्स एलियनवेअर १५ आणि १७ सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आठव्या पिढीतील आय नाइन के सीरीजपर्यंतचे प्रोसेसर्स दिल्याने हे आजपर्यंतचे सर्वांत शक्तीशाली लॅपटॉप्स ठरले आहेत. वापरकर्त्यांसाठी जे रोजच्या कम्प्युटिंगमध्ये आणि गेमिंग मशीनमध्ये समतोल साधू इच्छितात अशांसाठी ‘इन्स्पिरॉन २४ ५००० ऑल इन वन’ हे एकाच पॅकेजमध्ये आणण्यात आले आहे.

भारतातील गेमिंग बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. अशावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीत नाविन्य असण्याची गरज भासत आहे. रिसर्चस्केपने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार डेल हा भारतासह ११ शहरांमधील गेमर्सचा मोठा समुदाय कार्यरत असून, यामध्ये तरूणाईबरोबरच सर्व वयोगटांतील लोक सामील आहेत.

ही घोषणा करताना ‘डेल’च्या कन्झ्युमर आणि स्मॉल बिझनेसचे जनरल मॅनेजर आणि सिनियर व्हाइस प्रेसिडेंट पी. कृष्णकुमार म्हणाले, ‘२०१८मध्ये मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड हे नामानिधान मिळाल्याने ‘डेल’ने ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. हा विश्वास टिकवण्याची आमची जबाबदारी असून पीसीच्या सर्व विभागात चांगली उत्पादने आम्ही उपलब्ध करत आहोत. गेमिंग हा सर्वांत नवीन आणि बदलणारा विभाग आहे. जिथे आम्ही गेमर्सना पाहतो तिथे त्यांच्या पीसीकडून कार्यक्षमतेची अपेक्षा असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी ‘डेल’ने नेहमीच सर्व गेमर्स आणि गेमिंग समुदायासाठी प्राथमिकतेने उत्पादने बनवली आहेत.  विशाल अशा गेमिंग संस्कृतीच्या सहकार्यासाठी व भाग होण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत.’

‘डेल’ इंडियाच्या कन्झ्युमर आणि स्मॉल बिझनेसचे प्रॉडक्ट मार्केटिंग डायरेक्टर अॅलन जोस म्हणाले, ‘आमच्या गेमिंग उत्पादनश्रेणीतील डिझाइनची नाविन्यपूर्ण आणि अजोड तत्वे यांचा आम्हाला अभिमान आहे. या नवीन उत्पादन श्रेणीत अधुनिक प्रोसेसर्स आणि सडपातळ डिझाइनबरोबरच शक्तीशाली काम करण्याच्या तंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या गेमर्स ना अनोखो गेमिंग अनुभव मिळू शकेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link