Next
‘राष्ट्रवादी’च्या साहित्य, कला विभागाचे नामकरण
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची माहिती
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 01:44 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य, कला, व सांस्कृतिक विभागाचे नवीन नामकरण करण्यात आले असून यापुढे चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग या नावाने वाटचाल सुरू राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग या आधी कार्यरत होता; मात्र या विभागाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता हा विभाग चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. या विभागाच्या अध्यक्षपदी नंदकुमार बंड आणि कार्याध्यक्षपदी बाबासाहेब पाटील हेच काम पाहणार असल्याचे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search