Next
‘लेनिनग्राड चौकाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे नाव द्या’
भाजप आमदार सुधाकर भालेराव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
BOI
Tuesday, July 23, 2019 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

आमदार सुधाकर भालेरावमुंबई : प्रभादेवी येथील लेनीनग्राड चौकाचे नाव बदलून त्यास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी २२ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, अवधुत वाघ आणि सुनील नेरळकर उपस्थित होते.

आमदार भालेराव म्हणाले, ‘रशियामध्ये साम्यवादी विचार संपला असून, लेनिनग्राडचे महत्त्वही संपलेले आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आपणही प्रभादेवीतील सयानी रोड येथील लेनिनग्राड चौकाचे अण्णा भाऊ साठे चौक असे नामकरण करावे. त्याचबरोबर, गिरणगावात अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक विकसीत करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.’

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी १०० कोटींचा निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.

‘अमरावतीमधल्या बडनेरा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिका आणि वाचनालय बांधण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहोत,’ असे प्रदेश प्रवक्ते कुलकर्णी म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search