Next
बहुजन रयत पार्टीच्या राज्य महासचिवपदी माधव मेकेवाड
नागेश शिंदे
Saturday, July 13, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : पद्मशाली समाजाच्या सामाजिक जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारे सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड (मु. पो. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड) यांची बहुजन रयत पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. बहुजन रयत पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी ही घोषणा केली. 

आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये ते नांदेड जिल्हा संघटक व नांदेड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्य करीत होते. त्याचबरोबर नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडंट फ्रंटचे (मार्गदर्शक उदित राज व हर्षवर्धन दवणे) विद्यार्थी नेतृत्व करतानादेखील त्यांनी चांगले कार्य केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय मिळवून दिला. 

मेकेवाड यांच्या निवडीने बहुजन रयत पार्टीचे संघटन मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मुंबई प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, असे दिलीप मोहिते म्हणाले. 

माधव मेकेवाड म्हणाले, ‘माझ्यावर दिलीप मोहिते यांनी सर्वांत मोठी जबाबदारी टाकली आहे. ती मी चांगल्या पद्धतीने पार पाडीन. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुजन रयत पार्टीचे बीज रोवणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 66 Days ago
Hope , he travels over the different regions . They have to face different problems . To some extent , they are local . Yet , they are real .
0
0

Select Language
Share Link
 
Search