Next
पुण्यात मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी परिसंवाद
प्रेस रिलीज
Monday, July 15, 2019 | 02:23 PM
15 0 0
Share this article:

राज्याचे कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांचा सत्कार करताना एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी. शेजारी डावीकडून कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, पिंपरी-चवड महानगरपालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार व एनआयपीएमचे पुणे विभागाचे अध्यक्ष कॅप्टन

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) पुणे विभागातर्फे मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी परिसंवादाचे आयोजन मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात करण्यात आले होते. 

या प्रसंगी राज्याचे कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, पुणे जिल्ह्याचे कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, ‘एनआयपीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, ‘एनआयपीएम’ पुणे विभागाचे उपाध्यक्ष कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आदित्य जोशी, व्हायब्रंट एचआरचे अध्यक्ष शंकर साळुंखे, ओएचआरचे प्रशांत इथापे आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना राज्याचे कामगार राज्यमंत्री भेगडे म्हणाले, ‘भारताच्या एकूण औद्योगिक विकासात पुणे जिल्ह्याचे भरीव योगदान असून, जिल्ह्यात औद्योगिक शांतता नांदण्याच्या दृष्टीने कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून आपण योग्य ती जबाबदारी पार पाडू व कोणत्याही प्रसंगाला किंवा औद्योगिक क्षेत्राला अडचण येऊ नये यासाठी खंबीरपणे उद्योगक्षेत्रासोबत उभे राहू.’ 

या वेळी त्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या विविध तक्रारी व अडचणी या वेळी त्यांनी समजून घेतल्या व त्यावर शासन दरबारी सर्व प्रकारांचा सखोल अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले; तसेच कारखाना कायद्यातील जाचक तरतुदींबद्दल मनुष्यबळ व्यवस्थापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.  

‘एनआयपीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष कुलकर्णी म्हणाले, ‘मनुष्यबळ व्यवस्थापकांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी  ‘एनआयपीएम’तर्फे एक चळवळ उभी राहत असून, यात  सर्वांनी सहभागी व्हावे. औद्योगिक क्षेत्रात पुणे जिल्हा देशात अव्वल असून, या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाकडे  कामगार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्याने या भागातील  औद्योगिक क्षेत्रातील समस्या, प्रश्न लवकर निकाली निघतील, तसेच जिल्ह्यात औद्योगिक शांतता निर्माण होईल.’ 

कामगार राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भेगडे यांचा पुणेरी पगडी, उपरणे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘एनआयपीएम’च्या  कार्यकारी समिती सदस्य हेमांगी धोकटे यांनी केले. योगेश रांगणेकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘एनआयपीएम’चे सचिव नरेंद्र पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ  व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search