Next
बॉलीवूड सितारे जेव्हा पंतप्रधानांना भेटतात...
BOI
Saturday, January 12, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या नैतृत्वाखाली बॉलीवूडमधील अनेक सिताऱ्यांनी नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत देशाच्या विकासात चित्रपट इंडस्ट्रीचे कसे योगदान असेल, यावर चर्चा करण्यात आली. या सगळ्या कलाकारांनी या वेळी मोदी यांच्यासोबत काढलेला फोटो, खुद्द मोदी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

करण जोहर यांच्यासोबत बॉलीवूडमधील अनेक सितारे गुरुवारी (१० जानेवारी) नवी दिल्लीत पोहोचले, ते म्हणजे पंतप्रधानांची भेट घ्यायला. यामध्ये रोहित शेट्टी, निर्माती एकता कपूर, अभिनेता रणविर सिंग, रणबिर कपूर, आलिया भट, वरुण धवन, राजकुमार राव, विकी कौशल्य, आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, महावीर जैन आणि अश्विनी अय्यर – तिवारी हे उपस्थित होते. 

आगामी वर्षभरात आणि एकुणच फिल्म इंडस्ट्रीमध्ये घडणाऱ्या घडामोडी, येणाऱ्या समस्या आणि देशाच्या विकासात इंडस्ट्रीचे असलेले आणि यानंतर असणारे योगदान अशा काही विषयांवर या वेळी सर्वांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. चर्चेनंतर या सर्वांनी मोदी यांच्यासोबत एक ग्रूप फोटो काढला जो प्रत्येकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. खुद्द पंतप्रधानांनीही हा फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबरच सर्वांना या वेळी सेल्फी काढायचा मोह ही आवरला नाही. त्यांनी मोदींसोबत एक सेल्फीही काढला. 


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search